एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

0

मुंबई, दि.३०: बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना स्मरून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच त्यांनी जनतेचेही आभार मानले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी तसेच भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे तसेच आनंद दिघे यांचा जयजयकार केला.

तर भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंत आत फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री असतील.

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. भाजपा नेते देवेंद्र फडवणीस यांनी त्यांच्या नाव घोषित केले होते.

शपथविधी झाल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, हा बाळासाहेबांच्या विचारांच्या आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या शिकवणीचा विजय आहे. राज्याचा विकास आणि महाराष्ट्रातल्या सर्व घटकांना न्याय देण्याचं काम मी करणार आहे. सर्वांच्या साथीने विकासाचा गाडा नेण्यात येईल. उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सोबत कायम आहे, त्यांच्या साथीने महाराष्ट्राचा विकास करू.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here