Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

0

मुंबई,दि.2: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या जीवाला मोठा धोका असून त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाला (Intellenge Bureau) मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde News) यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याचीही माहीती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे पोलिस सतर्क झाले असून या संबंधी तपास सुरू आहे.

विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांना यापूर्वी नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर धमकीचा एक निनावी फोन देखील आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीच माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.

सरकारने पीएफआय (PFI) या संघटनेवर बंदी घातली असून त्याचा या प्रकरणाचा काही संबंध आहे का याचा तपास पोलिस (Mumbai Police) करत आहेत. या आधी नक्षलवाद्यांकडूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धमकी आली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांचे हिंदुत्ववादी सरकार ज्या दिवसापासून राज्यात आलं आहे तेव्हापासून अनेकांच्या पोटात दुखत असून त्या लोकांना अशा प्रकारची टोकाची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. पण अशा प्रकारची प्रवृत्ती आता ठेचून काढली जाईल. याच्या मुळाशी कोण आहे याचा तपास केला जाईल.”

महाविकास आघाडी सरकार काळातही गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री असताना एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी नक्षलवाद्यांनी दिली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. धमकी मिळाल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीचा दौरा केला होता. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here