एकनाथ खडसे यांचं भाजपा आमदाराबाबत मोठं विधानं

0

मुंबई,दि.20: विधान परिषद (Vidhan Parishad) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मोठं विधानं केलं आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) 10 जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की राज्यसभा निवडणुकीप्रमाणे भाजपा चमत्कार घडवणार याबाबत प्रचंड उत्कंठा लागली आहे.

शिवसेनेकडून सचिन अहीर, आमशा पाडवी रिंगणात आहेत. तर भाजपाकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उपा खापरे आणि प्रसाद लाड असे पाच उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना तिकीट दिलं आहे. तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप आपलं नशिब आजमावत आहेत.

शिवसेनेचं ठरलं

काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची चार ते पाच मतं काँग्रेसला देणार असल्याचं आश्वासन दिल्याचं सांगण्यात येत आहे.

भाजपाचे आमदार संपर्कात

एकनाथ खडसे यांनी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत भाजपाचे अनेक आमदार माझ्या संपर्कात, पण मत देतील अशी आशा नाही असं म्हटलंय. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय. भाजपामध्ये माझे अनेक समर्थक आहेत. काहींना तिकीट देण्यासाठी मी मदत ही केली आहे.

भाजपामध्ये बरेच जण माझ्याशी मनापासून प्रेम करणारे आहेत. मात्र ते पक्ष सोडून मला मतदान करतील असं वाटतं नाही. परंतु काही लोक माझ्या संपर्कात आहेत. परंतु त्यांनी मला मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली नसल्याचं सांगितलं आहे. भाजपाची भूमिका ही केवळ एकनाथ खडसे पडले पाहिजे अशी नाही, तर महाविकास आघाडीचे उमेदवार पडले पाहिजे अशी असल्याच खडसे यांनी यावेळी व्यक्त केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here