शिक्षणमंत्र्यांची वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्या दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर

1

SSC HSC Exam : दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक दरवर्षी नोव्हेंबरमध्येच जाहीर होतं, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे वेळापत्रक येण्यास उशीर झाला. माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावी आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच बारावी परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत होईल. बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि लेखी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंच होणार आहेत. तसेच दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत होणार आहे. दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि लेखी परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीमध्ये होणार आहेत.

या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असून पेपर पॅटर्न आणि गुणांचे मुल्यमापन आधीप्रमाणेच होईल असेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा याकडे शिक्षणविभागाचे लक्ष असल्याचे त्या म्हणाल्या.


1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here