ED Raids Hasan Mushrif: राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर ईडीची छापेमारी

ED Raids Hasan Mushrif: हसन मुश्रीफ यांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु

0

कोल्हापूर,दि.11: राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif News) यांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली आहे. सकाळी 6 वाजल्यापासून ईडीकडून (ED) छापेमारी सुरु करण्यात आली आहे. (ED Raids Hasan Mushrif) छापेमारी होत असल्याची मुश्रीफ यांनी एबीपी माझाकडे पुष्टी केली आहे. लवकरच सर्व माहिती घेऊन बोलणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. मुश्रीफ सध्या घरी नसल्याचे सांगण्यात आले आहे.

किरीट सोमय्या यांचे हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप | Hasan Mushrif News

हसन मुश्रीफ यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोपांची मालिका सुरू केली होती. सातत्याने त्यांच्यावर ईडीची छापे पडणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते. सोमय्या यांनी कारखाना कार्यस्थळावर भेट दिली होती. दरम्यान, प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर छापे पडल्याचे समजते. आज सकाळपासून कोल्हापूर आणि पुण्यामध्ये छापेमारी सुरू केली आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार आपासाहेब नलवडे कारखान्यामधील झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून हे प्रकरण आहे. हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणावरून आरोप यापूर्वीच फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर आपला काही संबंध नाही असं म्हटलं होतं.

ED Raids Hasan Mushrif
हसन मुश्रीफ

हेही वाचा Sanjay Raut: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर संजय राऊत यांची सूचक प्रतिक्रिया

सकाळपासून छापेमारी | ED Raids Hasan Mushrif

आमदार हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाचवेळी सकाळपासून छापेमारी करण्यात आली आहे. घराला परिसरात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त

मुश्रीफ आणि प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या छाप्याची माहिती स्थानिक पोलिसांना नसल्याची माहिती समोर आली आहे. कोणाला काही समजण्या अगोदरच अधिकाऱ्यांनी बंगल्यामध्ये प्रवेश केला आणि छाप्यास सुरुवात केली. बंगल्याच्या चारी बाजूने बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी बंदोबस्त झालेले सर्व पोलीस दिल्ली पोलिस दलातील आहेत.

यापूर्वीही हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी

जुलै 2019 मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती. आयकर विभागानं केवळ कोल्हापुरातच नव्हे, तर हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील घरीही छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील घरावर आयकर विभागानं छापा टाकला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here