Earthquake News: भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

0

नवी दिल्ली,दि.13: Earthquake News: आज (दि.13) दुपारी दीडच्या सुमारास भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआर, जम्मू काश्मीर, चंदीगडसह भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचा प्रभाव होता. भारतात भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.4 इतकी मोजण्यात आली आहे. 

Earthquake News | भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे होता. त्याची खोली जमिनीच्या आत 6 किलोमीटर होती. हे धक्के बराच वेळ जाणवत होते. मात्र, आतापर्यंत भारत किंवा पाकिस्तानातून कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही. पाकिस्तानात भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी मोजली गेली आहे.

श्रीनगरच्या एका व्यक्तीने भूकंपाविषयी सांगितलं की आज जे झटके बसले ते तीव्र होते. जी मुलं शाळेत गेली होती ती घाबरली होती. गेल्या काही महिन्यांपासून भूकंपाचे झटके बसले आहेत. EMSC च्या माहितीनुसार किश्तवाडच्या 30 किमी अंतरावर असलेल्या दक्षिण पूर्व भागात हा भूकंप आला.

याआधी मार्च महिन्यात भूकंप

याआधी मार्च महिन्यात भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.6 इतकी होती. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, हिमाचल, पंजाब, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचा प्रभाव होता. अफगाणिस्तानचा हिंदुकुश प्रदेश भूकंपाचा केंद्रबिंदू होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here