महाराष्ट्रातील या जिल्ह्यात जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

0

नांदेड,दि.21: महाराष्ट्रातील हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील काही भागांना गुरुवारी एकापाठोपाठ दोन-तीन भूकंपाचे धक्के जाणवले. सुमारे 10 मिनिटांच्या अंतराने हे धक्के नोंदवले गेले. बीड जिह्यातील काही भागांत देखील भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असल्याची माहिती आहे.

हिंगोलीत सकाळी 6.08 वाजता भूकंपाचा पहिला धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.5 इतकी होती. त्याचवेळी सकाळी 6.19 वाजता भूकंपाचा दुसरा धक्का नोंदवण्यात आला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.6 नोंदवण्यात आली. 

भूकंप का होतात?

भूकंप कसे होतात हे समजून घेण्यासाठी प्रथम आपल्याला पृथ्वीची रचना वैज्ञानिकदृष्ट्या समजून घ्यावी लागेल. पृथ्वी टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. त्याच्या खाली द्रवरूप लावा आहे आणि त्यावर टेक्टोनिक प्लेट्स तरंगत आहेत. अनेक वेळा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात. वारंवार आदळल्यामुळे, काहीवेळा प्लेट्सचे कोपरे वाकतात आणि जेव्हा जास्त दाब असतो तेव्हा या प्लेट्स तुटू लागतात. अशा स्थितीत खालून येणारी ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते. जेव्हा यामुळे गोंधळ निर्माण होतो तेव्हा भूकंप होतो.

सेलू शहरात आणि तालुक्यात सकाळी सहा वाजून दहा मिनिटाला जवळपास ६ सेकंदाचा सौम्य भूकंपाचा धक्का झाल्याचा  प्रकार घडला आहे. सहा वाजून दहा मिनिटाला खडखड असा आवाज होत जमीन हादरल्याचा प्रकार जवळपास ६ सेकंद सुरू होता. विशेषतः ज्यांची घरे पत्राची आहेत त्यांना मात्र हा प्रकार मोठ्या प्रमाणात लक्षात आल्याने  धावपळ उडाली. काही वेळातच भुकंपाच्या सौम्य धक्याची माहिती सोशलमिडीयावर व्हायरल झाली. तालुक्यातील चिकलठाणा ,देवगांवफाटा या भागात हा सौम्य ६:१२ मि.झाला.

नांदेड शहर आणि जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील अनेक गावांत आज सकाळी ६ वा ८ मि आणि ६ वा १९ मि भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने भितीने नागरिक घराबाहेर पडले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here