Earthquake: महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील गावांना भूकंपाचा धक्का

Earthquake In Hingoli: रिश्टर स्केलवर 3.6 अशी या भूकंपाची नोंद झाली

0

हिंगोली,दि.8: हिंगोलीत भूकंपाचे (Earthquake) हादरे बसले आहेत. सोळा ते अठरा गावांत सौम्य धक्के बसल्याची प्रशासनाने माहिती दिली आहे. अनेक गावांना रविवार च्या पहाटे 4.31 मि ला भुगर्भातुन मोठा आवाज येत भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. भुकंपाच्या धक्कयाने तालुक्यात कोठेच हानी व नुकसान झाले नसल्याची माहिती तहसिल प्रशाशनाने दिली. 6 ते 7 वर्षापासून सतत भुकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांत आता भिती व्यक्त केल्या जात आहेत. (Earthquake In Hingoli)

हेही वाचा Sharad Koli | तुम्ही शारिरीक वजन कमी केले, उरले-सुरलेले राजकीय वजन आम्ही संपवू: शरद कोळी

या गावात भूकंपाचे धक्के | Earthquake

वसमत तालुक्यातील वसमत, कुरुंदा, गिरगाव, कवठा, वर्ताळ, डोणवाडा, सेलु,पार्डी, कोठारी,पांग्रा शिंदे, वापटी, कुपटी, शिरळी यासह औढानागनाथ व कळमनुरी तालुक्यातील ही अनेक गावांना 8 जानेवारी च्या पहाटे 4.31 मि दरम्यान भुगर्भातुन मोठा आवाज येत जमिन हादरली. येथील तिन्ही तालुक्यातील अनेक गावांना गत 6 ते 7 वर्षांपासून भुकंपाचे धक्के सतत जाणवत आहेत, यापूर्वी दोन वेळेस भुकंपाची नोंददेखील झाली आहे. सतत भुकंपाचे धक्के जाणवत आसल्याने नागरिकांत भिती व्यक्त केल्या जात आहेत. 

Earthquake
भूकंप

हानी नाही | Earthquake News

रविवार रोजी पहाटे जाणवलेल्या भुकंपाच्या धक्कयात कोठेही हानी व नुकसान झाली नसली तरीही नागरिक भयभीत झाले आहेत. रिश्टर स्केलवर 3.6 अशी या भूकंपाची नोंद झाली आहे. दरम्यान भूकंपाच्या या धक्क्यात कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here