दसरा मेळावा: शिंदे गटाने घेतला अर्ज मागे, ठाकरे गटाचा मार्ग मोकळा

0
संजय राऊत-एकनाथ शिंदे

मुंबई,दि.१०: दसरा मेळावा: मुंबईच्या शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेता यावा याकरता ठाकरे आणि शिंदे गटाकडून मुंबई महापालिकेत ऑगस्ट महिन्यात अर्ज करण्यात आले होते. परंतु, या अर्जप्रक्रियेत शिंदे गटाने फेरफार केल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी काल (९ ऑक्टोबर) केला होता. तसंच, मुंबई पालिकेने परवानगी दिली नाही तर याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचाही इशारा दिला होता. दरम्यान, आज (१० ऑक्टोबर) शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्याचा ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे.

दसरा मेळावा: काय म्हणाले संजय राऊत?

“दसरा मेळावा होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न झाले. बेईमान लोकांना हाताशी पकडून अनेक प्रयत्न झाले. शेवटी शिवसेना ही आग आहे, ताकद आहे. तुम्ही कितीही अडथळे आणा. सर्व अडथळे पार करून आम्ही तिथे मेळावे घेतले आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा हा महाराष्ट्रातील एक उत्सव असतो. तो संस्कृतीचा भाग आहे, आणि तो कोणी रोखू शकत नाही”, असं संजय राऊत म्हणाले. आज त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here