दि.२ : WhatsApp ने नवीन आयटी नियमांचे पालन सुरू केले आहे. कंपनीने याच आधारावर ऑगस्ट महिन्यात तब्बल २० लाख भारतीय यूजर्सचे अकाउंट बंद केल्याचे समोर आले आहे. कंपनीला ऑगस्टमध्ये ४२० तक्रारी आल्या होत्या. या आधारवर कंपनीने कारवाई केली आहे. व्हॉट्सअॅपने आपला नवीन रिपोर्ट जारी केला आहे. याआधी कंपनीने भारतात १६ जून ते ३१ जुलै या ४६ दिवसांच्या कालावधी, ३,०३७,००० अकाउंट्स बंद केले होते. या संदर्भात महाराष्ट्र टाइम्सने वृत्त दिले आहे.
सोशल मीडिया कंपनी फेसबुकने ऑगस्ट महिन्यात नियमांचे उल्लंघन केल्यानंतर १० वेगवेगळ्या कॅटेगरीमधील ३.१७ कोटी कॉन्टेंटवर कारवाई केली आहे. व्हॉट्सअॅपच्या रिपोर्टनुसार, ऑगस्ट महिन्यात २०,७०,००० भारतीय अकाउंट्स बॅन केले.
व्हाट्सॲप ने याआधी म्हटले होते की, जे अकाउंट्स बॅन करण्यात आले आहेत त्यातील ९५ टक्क्यांपेक्षा अधिकवर Bulk Messages चा अयोग्य वापर केल्याने कारवाई करण्यात आली. जागतिक स्तरावर व्हाट्सॲप ने दरमहिन्याला ८० लाख अकाउंट्स बॅन केले आहेत.
WhatsApp ने म्हटले की, भारतीय यूजर्सकडून दोन पद्धतीने तक्रारी आल्या. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार अधिकाऱ्याला ई-मेलच्या माध्यमातून आणि WhatsApp अकाउंटबाबत माहिती, पोस्टाच्या माध्यमातून तक्रारी मिळाल्या.
फेसबुकने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ऑगस्ट २०२१ मध्ये ३.१७ कोटी कॉन्टेंटवर कारवाई करण्यात आली. इंस्टांग्रामने वेगवेगळ्या प्रकारातील २२ लाख कॉन्टेंटला हटवले आहे. फेसबुकनुसार, १ ते ३१ ऑगस्ट दरम्यान, तक्रारीच्या माध्यमातून ९०४ यूजर्सचा रिपोर्ट मिळाला. यातील ७५४ प्रकरणं निकाली काढली गेली. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, तीन कोटींपेक्षा अधिक कन्टेन्टचामध्ये स्पॅम २.९ कोटी), हिंसक (२६ लाख), अश्लील (२० लाख), द्वेष पसरवणे (२,४२,०००) अशाप्रकारच्या कन्टेन्टचा समावेश होता.