देशात विक्रमी लसीकरण झाल्याने केंद्र सरकार देत आहे तीन महिन्याचा रिचार्ज फ्री?

0

दि.5 : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मेसेज व्हायरल होतात. WhatsApp वर बऱ्याचवेळा फेक मेसेज व्हायरल होतात. WhatsApp असाच एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये देशात विक्रमी लसीकरण झाल्याने केंद्र सरकार तीन महिन्याचा रिचार्ज फ्री देणार आहे असा दावा करण्यात आला आहे. या मेसेजबाबत प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) याबाबत अलर्ट केलं आहे.

PIB कडून, WhatsApp मेसेजमध्ये सरकार एयरटेल (Airtel), जियो (Jio) आणि वोडाफोन-आयडिया (Vi) युजर्सला 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज देण्याच्या दाव्याची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीमध्ये केंद्र सरकारने अशी कोणतीही घोषणा केली नसल्याचं समोर आलं आहे. PIB ने हा दावा पूर्णपणे खोटा आणि आधारहीन असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे कोणत्याही युजरने या दाव्याच्या जाळ्यात अडकू नये, असं PIB कडून सांगण्यात आलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here