Drug Supply Through Cats | तुरुंगात मांजरीद्वारे होत होता ड्रग्जचा पुरवठा, Video आला समोर

0

सोलापूर,दि.२१: Drug Supply Through Cats | मानव अनेक अवैध धंदे करतात. पैशासाठी मनुष्य कुठल्याही थराला जात आहेत. मानव वाईट कृत्यांसाठी ओळखले जातात, परंतु कधीकधी ते या वाईट कृत्यांसाठी प्राण्यांचा देखील वापर करतात. अमली पदार्थांच्या तस्करीसाठी नवीन पद्धती वापरल्या जातात. मध्य अमेरिकेतील एका छोट्या देशात मांजरींचा वापर करून ड्र्ग्ज पुरवली जात आहेत. ही बाब उघडकीस आल्यानंतर लोकांना धक्का बसला आहे. (Cats News Marathi)

मांजरीला ड्रग्जची तस्करी करताना पकडले | Drug Supply Through Cats

मध्य अमेरिकेतील कोस्टा रिका येथील तुरुंगात एका मांजरीमार्फत ड्रग्जची तस्करी केली जात होती. कोस्टा रिकाच्या पोकोसी तुरुंगाच्या प्रशासनाने या मांजरीला ड्रग्जची तस्करी करताना पकडले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिच्या शरीरावर ड्रग्जचे पॅकेट बांधलेले आढळले. पोलिसांनी ड्रग्ज जप्त केली आणि मांजरीला प्राणी आरोग्य सेवेकडे सोपवले. 

मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एका रक्षकाने ग्रीन झोनमध्ये मांजरीला संशयास्पद स्थितीत पाहिले आणि त्याने ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. वेळेवर कारवाई केल्यामुळे, ड्रग्ज तुरुंगात पोहोचण्यापूर्वीच जप्त करण्यात आले.

Drug Supply Through Cats

कोस्टा रिकन तुरुंगात मांजरीद्वारे ड्रग्जची तस्करी केल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी आता संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे. हे कोणत्याही संघटित तस्करी टोळीचा भाग आहे का, ज्यामध्ये तुरुंगातील कैदी आणि बाहेरील नेटवर्क गुंतलेले आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here