डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही गांधींच्या विचारांबाबत टीका केली होती: रणजीत सावरकर

0

मुंबई,दि.२७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही गांधींच्या विचारांबाबत टीका केली होती असे स्वातंत्रवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी म्हटले आहे. स्वांतत्रवीर सावरकर जेव्हा समाजातून जातीभेद नष्ट करण्यासाठी झटत होते, तेव्हा गांधीजी चातुर्वर्णाच्या बाजूने होते. गांधींचा जातीभेदावर विश्वास होता, असा गंभीर आरोप रणजीत सावरकर यांनी केला आहे. एपीबी माझा वृत्तवाहिनीच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

”स्वांतत्रवीर सावरकर जेव्हा समाजातून जातीभेद नष्ट करण्यासाठी झटत होते, तेव्हा गांधीची चातुर्वर्णाच्या बाजूने होते. गांधींचा जातीभेदावर विश्वास होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही गांधींच्या विचारांबाबत टीका केली होती”, अशी प्रतिक्रिया रणजीत सावरकर यांनी दिली. ”ब्रिटीशांविरुद्ध कोणतंही आंदोलन करायचं नाही, अशी अधिकृत भूमिका काँग्रेसने घेतली होती. १२ फेब्रुवारी १९२२ रोजी काँग्रेस कार्यकारिणीचा तसा ठराव आहे. त्याची कागदपत्रं आहेत.”, असा दावाही रणजीत सावरकर यांनी केला.

यावेळी बोलताना त्यांनी सावरकरांच्या कथीत माफीनाम्यासंदर्भातही प्रतिक्रिया दिली. ”सावरकरांनी कधीही माफी मागितली नाही. सावरकरांनी १९१३ ब्रिटीशांकडे पहिला अर्ज केला होता. १९१३ मध्ये त्यांनी जो अर्ज केला होता, तो सुटका करावी यासाठी नव्हता. ब्रिटीशांच्या नियमाप्रमाणे सहा महिने प्रत्येक कैदाला सहा महिने कोठडीत ठेवण्यात येत होते आणि उर्वरित सहा महिने त्यांना जेल परिसरात ठेवण्यात येत होते. स्वतंत्र आणि बंदीवान अशी त्यावेळी पद्धत होती. मात्र, क्रांतीकारकांना तीन-तीन वर्ष कोठडीतून बाहेर काढण्यात येत नव्हते. त्यामुळे त्यांनी पत्र ब्रिटीशांना पत्र लिहिले होते, त्याला आपण माफीनामा कसा म्हणू शकतो?” अशी प्रतिक्रिया रणजीत सावरकर यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here