स्मार्टफोनवर हे अ‍ॅप्स डाउनलोड करणं धोकादायक ठरू शकतं

0

दि.3: स्मार्टफोन (Smartphone) वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेकजण मोबाईल फोनवर ॲप डाऊनलोड करतात. एकीकडे स्मार्टफोन युझर्सची संख्या वाढत असताना, दुसरीकडे विविध मार्गांनी स्मार्टफोनवरचा डेटा चोरी करणं, फसवणूक करणं आदी प्रकार वाढत आहेत. अशा प्रकारची फसवणूक करण्यासाठी अ‍ॅप्सचाही (Apps) वापर केला जातो.

आपल्याला स्मार्टफोनमध्ये बॅटरी बूस्टर (Battery Booster), डेटा क्लीनरच्या जाहिराती दिसतात. प्रामुख्याने यू-ट्यूब, गुगल क्रोमवर या जाहिराती पाहायला मिळतात. काही युझर्सकडून चुकून या वेबसाइट्सच्या नोटिफिकेशनला परवानगी दिली गेली, तर अशा जाहिराती वारंवार स्क्रीनवर येत राहतात. या जाहिराती बनावट (Fake) असू शकतात.

डेटा चोरण्याच्या उद्देशाने अशी अ‍ॅप्स तयार केलेली असतात. यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. पूर्ण खात्री केल्याशिवाय अशा जाहिरातींवर क्लिक करणं, डेटा क्लिनर, बॅटरी बूस्टर अ‍ॅप्स डाउनलोड करणं धोकादायक ठरू शकतं. एका वृत्तवाहिनीने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

स्मार्टफोनवर आपल्याला डेटा क्लीनर आणि बॅटरी बूस्टर अ‍ॅप्सच्या जाहिराती नेहमीच पाहायला मिळतात. या जाहिराती फसव्या असू शकतात. स्मार्टफोनला खरं तर या कारणासाठी कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅप्सची (Third Party Apps) गरज नसते. डेटा चोरण्याच्या उद्देशानं अशी अ‍ॅप्स तयार केलेली असतात. त्यामुळे या गोष्टींशी संबंधित जाहिरातींमधली अ‍ॅप्स डाउनलोड केल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं.

अशी घ्या खबरदारी

गूगल (Google), यू-ट्यूब (Youtube), फेसबुक (Facebook) किंवा अन्य प्लॅटफॉर्म्स युझर्सचा सर्च पॅटर्न ट्रॅक करत असतात. युझर गुगलवर कोणत्या गोष्टी सर्च करतो, त्याची आवड काय आहे, या गोष्टींच्या आधारावर त्याच्या स्मार्टफोनवर जाहिराती दाखवल्या जातात. स्मार्टफोनची बॅटरी कशी बूस्ट करावी, याविषयी तुम्ही गुगलवर सर्च केलं असेल तर गुगल अ‍ॅड्स तुमच्या सर्च अल्गोरिदमवर काम करतं. त्यामुळे या गोष्टीशी संबंधित जाहिराती वारंवार तुम्हाला स्मार्टफोनच्या स्क्रीनवर दिसू लागतात. त्यामुळे सुरक्षिततेसाठी तुम्ही इनकॉग्निटो मोड (Incognito mode) सुरू करून सर्च करणं गरजेचं आहे. तसंच थर्ड पार्टी अ‍ॅप्स डाउनलोड करण्यापूर्वी, त्याबाबत थोडं रिसर्च करणंही आवश्यक आहे. गुगल किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून कोणतंही अ‍ॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याचे रिव्ह्यू वाचणं गरजेचं आहे.

युझर्सचा डेटा चोरी करणं हा काही अ‍ॅप्सचा उद्देश असतो. तुम्ही अशी अ‍ॅप्स डाउनलोड केलीत, तर तुमचा स्मार्टफोन हॅक होण्याची शक्यता वाढते किंवा डेटा चोरी होऊ शकतो. ही अ‍ॅप्स तुमचा आयडी-पासवर्ड, तसंच खासगी फोटोदेखील चोरू शकतात. अशा अ‍ॅप्सची कोणतीही ठोस यादी नाही; पण त्यांची संख्या मोठी आहे.

ही अ‍ॅप्स डाउनलोड केल्यावर आपला डेटा चोरी होतोय, ही गोष्ट युझर्सच्या लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे कोणतंही थर्ड पार्टी अ‍ॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याचा रिव्ह्यू पाहणं, माहिती घेणं आणि गरज पडल्यास रिसर्च करणं आवश्यक आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here