Donald Trump: डोनाल्ड ट्रम्पसोबत जेवण्यासाठी मोजावे लागणार इतके कोटी रुपये 

0

सोलापूर,दि.19: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या शपथविधीची तयारी जोरात सुरू आहे. 20 जानेवारी रोजी ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. पण त्याआधी ट्रम्प यांच्या ‘डिनर पॉलिटिक्स’ची अमेरिकेत जोरदार चर्चा आहे. खरं तर, ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स यांच्यासोबत खाजगी जेवणासाठी लोकांना मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागत आहेत. त्याला फंडरेझिंग डिनर असे नाव देण्यात आले आहे.

तिकिटांची किंमत जाणून धक्का बसेल

द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, पैसे गोळा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या डिनर इव्हेंटमधील तिकीट पॅकेजची 5 वेगवेगळ्या स्तरांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या तिकिटाची किंमत 1 मिलियन यूएस डॉलर म्हणजेच सुमारे 9 कोटी रुपये आहे. याशिवाय इतर तिकिटांची किंमत $500,000, $250,000, $100,000 आणि $50,000 आहे. त्याच वेळी, मोठ्या देणगीदारांना अध्यक्ष ट्रम्प आणि उपाध्यक्षांना खाजगी कार्यक्रमांमध्ये भेटण्यासाठी दुप्पट पैसे द्यावे लागतील.

यासाठी सर्वात जास्त किंमत 1 मिलियन डॉलर ठेवण्यात आली आहे. पॅकेजच्या या टियरमधील देणगीदारांना उपाध्यक्ष-निर्वाचित वन्स यांच्यासोबतच्या डिनरसाठी दोन तिकिटे आणि ट्रम्प यांच्यासोबतच्या “कँडललाइट डिनर”साठी सहा तिकिटे मिळतील. अहवालानुसार, या सर्वाधिक रकमेच्या पॅकेजसाठी अनेकांनी पैसे दिले आहेत.

2 हजार कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट

उद्घाटन समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे की या डिनर ऑफरमधून आतापर्यंत सुमारे 1700 कोटी रुपये जमा झाले आहेत. तर एकूण 2 हजार कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

खाजगी डिनर खास का?

अहवालानुसार, 2017 मध्ये राष्ट्रपतींसोबत झालेल्या डिनर कार्यक्रमात $106 दशलक्ष रक्कम जमा झाली. त्याच वेळी, बिडेन यांनी शपथ घेण्यापूर्वी या कार्यक्रमात 135 दशलक्ष डॉलर्स जमा झाले होते. 

यावेळी ट्रम्प यांना भेटण्यासाठी लोकांमध्ये विशेष उत्साह आहे. विशेषत: मोठे उद्योगपती ट्रम्प यांच्याशी बोलण्यात विशेष रस दाखवत आहेत. तंत्रज्ञान नेते आणि विविध अब्जाधीशांनी त्यांच्या देणग्या वाढवल्या आहेत जेणेकरून ते ट्रम्प यांच्याशी संपर्क निर्माण करू शकतील आणि जेव्हा ते व्हाईट हाऊसमध्ये परत येतील तेव्हा त्यांच्यापर्यंत प्रवेश मिळवू शकतील.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here