नागपूर,दि.5: Don Arun Gawli: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडीची तुरुंगातून सुटका होणार असल्याची महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुदतपूर्व सुटका करण्यात यावी असे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. अरुण गवळीची मुदतीपूर्व सुटका होणार आहे. 2006 च्या शासन निर्णयाच्या आधारे डॉन अरुण गवळीने शिक्षेतून सुट देण्याची मागणी केली होती.
अरुण गवळीच्या त्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पुर्ण झाली होती. मात्र कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने अरुण गवळी यांची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही दिला आहे.
नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात अरूण गवळी उर्फ डॅडी याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तसेच इतर गुन्हेगारी कृत्यासाठीही त्याला जन्मठेप ठोठावण्यात आली. सध्या अरुण गवळी नागपूच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
अरुण गवळी याला खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेत सुट मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात याचिका दाखल केली होती. 2006च्या शासन निर्णयानुसार वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या व अशक्त असलेल्या कैद्यांना उर्वरित शिक्षेत सूट देऊन कारागृहातून सुटका करण्याची तरतूद आहे. त्याचआधारे शिक्षेत सूट मिळवण्यासाठी गवळीने अर्ज सादर केला होता. गवळीच्या याचिकेवर 5 मार्च रोजी सुनावणी पूर्ण झाली होती. निकाल राखीव ठेवण्यात आला होता. आज या प्रकरणाचा निकाल लागला आहे.