सोलापूर,दि.३०: Doctor Surgery Video: भूकंपातही (Earthquake) डॅाक्टरांनी रूग्णावर शस्त्रक्रिया करणे थांबवले नाही. डॅाक्टरांनी रूग्णावर शस्त्रक्रिया सुरू केल्यानंतर अचानक भूकंपाचे धक्के जाणवू लागले, तरीही डॅाक्टरांनी शस्त्रक्रिया सुरूच ठेवली. बुधवारी सकाळी रशियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले, त्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त समोर येत आहे. रशियाच्या पूर्वेकडील कामचटका येथे पहाटे भूकंप झाला.
रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ८.८ इतकी होती, जी अत्यंत धोकादायक मानली जाते. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, भूकंपाचे केंद्र समुद्राखाली होते, त्यामुळे समुद्रात येणाऱ्या प्रचंड लाटांमुळे बरेच नुकसान झाले आहे.
भूकंपातही डॉक्टरांनी नाही थांबवली शस्त्रक्रिया! Doctor Surgery Video
भूकंपानंतर, जपान आणि अमेरिकन एजन्सींनीही त्यांच्या सागरी भागात त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. भूकंप आणि त्यामुळे झालेल्या विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर, रशियामधून एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांची तयारी दिसून येते.
रशियाच्या सरकारी टेलिव्हिजन नेटवर्क रशिया टुडे (RT) ने त्यांच्या X हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये डॉक्टर रुग्णावर शस्त्रक्रिया करत असल्याचे दिसून येते आणि भूकंपाचे धक्के जाणवताच, जवळ बसलेला दुसरा डॉक्टर देखील रुग्णाचे रक्षण करण्यासाठी शस्त्रक्रिया बेडजवळ येतो.
सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमध्येही डॉक्टर रुग्णाची शस्त्रक्रिया सुरू ठेवत आहेत आणि इतर डॉक्टर त्याच्या सुरक्षेसाठी त्याला धरून आहेत. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमध्येही डॉक्टर ज्या शांततेने आपले काम करत राहिले त्याचे आता खूप कौतुक केले जात आहे.
आरटीने शेअर केलेल्या व्हिडिओ पोस्टमध्ये असे म्हटले आहे की भूकंप संपेपर्यंत आणि शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्व डॉक्टर रुग्णाजवळ उभे होते. रशियन आरोग्य मंत्रालयानेही या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की रुग्णाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे आणि आता त्याची प्रकृती चांगली आहे.