Viral Photo : नरेंद्र मोदी, दिवंगत राजीव गांधी व राज ठाकरे यांच्या फोटोची चर्चा

0

Viral Photo : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 13 डिसेंबर रोजी वाराणसी (Varanasi) दौऱ्यावर होते. त्यांनी काशी विश्वधाम कॉरिडोअरचं (Kashi Vishwanath Dham Corridor) लोकार्पण केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक निराळे रुप पहायला मिळाले.

लोकार्पण आणि इतर कार्यक्रम आटोपल्यावर भोजनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सफाई कामगारांसोबत (Sweepers) बसून जेवण करताना दिसून आले. (Prime Minister Narendra Modi had a meal with the cleaners) नरेंद्र मोदी यांचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला.

त्यानंतर लगेच काँग्रेसने राजीव गांधी यांचा गोरगरिबांसोबत जेवतानाचा फोटो शेअर केला. दोन्ही फोटोंची तुलना होत नाही तोच आणखी एक फोटो धडकला. तो म्हणजे राज ठाकरे यांचा कार्यकर्त्यांसोबत जेवतानाचा आणि पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली.

नरेंद्र मोदी यांचा फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसांच्या काशीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते काशी विश्वनाथ धामचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मोदींनी गंगा स्नान केलं. कालभैरव मंदिरात आरती केली. लेजर शो पाहिला आणि सफाई कामगारांसोबत बसून जेवणही केलं. मोदी सफाई कामगारांसोबत जेवायला बसल्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाला. यावेळी मजुरांवर पुष्प वृष्टीही करण्यात आली. पुष्पवृष्टी आणि भोजनाचा कार्यक्रम या दोन्ही गोष्टींची प्रचंड चर्चा झाली. मोदींच्या या फोटोवर टीकाही झाली. भाजपचा हा केवळ दिखावा असल्याची त्यांच्यावर टीकाही करण्यात आली.

दिवंगत राजीव गांधी यांचा फोटो

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लागलीच माजी पंतप्रधान, दिवंगत राजीव गांधींचा (Rajiv Gandhi) एक फोटो शेअर केला. यावेळी त्यांनी दोन्ही फोटोंची तुलनाही केली. राजीव गांधी गोरगरीबांसोबत सहजपणे बसून जेवत आहेत. तर मोदींची मजुरांसोबतची पंगत ही उच्च दर्जाचा इव्हेंट होता, अशी टीका पटोले यांनी केली.

या फोटोत राजीव गांधी एका टेबलवर गोरगरीबांसोबत जेवायला बसलेले दिसत आहेत. राजीव गांधी अत्यंत सहजतेने गोरगरीबांसोबत जेवताना दिसत आहेत. साध्या पत्रावळीमध्ये जेवण घेऊन ते जेवताना दिसत असल्याचं दिसतं.

राज ठाकरे यांचा फोटो

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे यांनी पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष संतोष चव्हाण यांचा घरी जेवणाचा आस्वाद घेतला. सोबत मनसे नेते अनिल शिदोरे, बाबू वागासकर, सरचिटणीस किशोर शिंदे, मनसे राज्य सचिव सचिन मोरे, उपाध्यक्ष बाळा शेडगे, गगरसेवक वसंत मोरे, श्रीनिवास घाटगे हेही उपस्थित होते. कमरेवर झालेल्या शस्त्रक्रीयेमुळे नेहमी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सोबत जमिनीवर पंगतीत बसणारे राज ठाकरे यांना यावेळी खुर्चीवर बसून जेवावे लागले. राज यांचा हा फोटो व्हायर झाल्याने त्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here