सोलापूर,दि.6: Dilip Dhotre MNS: मनसे नेते दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांनी स्वखर्चाने हिंदू स्मशानभूमी दुरुस्ती नुतनीकरण कामास सुरुवात केली आहे. पंढरपूर (Pandharpur) शहरातील गोपाळपूर रोड येथील हिंदू स्मशानभूमीची स्थिती अतिशय खराब झाली आहे. दहन करण्यासाठी असलेले सर्व पाचही कट्ट्याचे काँक्रीट निघाले आहे. मृत्यू झाल्यानंतर दहन करण्यासाठी असलेले स्मशानभूमीत एकूण पाच कट्टे आहेत.
पाचही कट्ट्याची दुरावस्था झाली असून सर्व विटा फुटलेले आहेत. खड्डे पडलेले आहेत. तरी देखील पंढरपूर नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले होते. वारंवार नगरपालिकेला सांगून देखील ते दुरुस्ती करण्यात आली नाही. या सर्व कट्ट्यांची मनसे नेते दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांच्या वतीने स्वखर्चाने दुरुस्ती करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी समाजसेवक नानासाहेब कदम, नगरसेवक लखन चौगुले, नगरसेवक किरण घाडगे, नगरसेवक शिवाजी मस्के, नगरसेवक प्रशांत शिंदे, नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, नगरसेवक महंमद उस्ताद, पंढरपूर मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, मनसेचे शहराध्यक्ष संतोष कवडे, मनसे पंढरपूर शहर उपाध्यक्ष गणेश पिंपळनेरकर, राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे, साईनाथ बडवे, समाजसेवक बजरंग बंदपट्टे, सुरज देवकर, हिंदू महासभेचे अध्यक्ष बाळासाहेब डिंगरे, नगरसेवक विवेक बेणारे ,अभयशिंग इचगावकर,माधव महाराज बडवे, सतीश आप्पा शिंदे,अमर सूर्यवंशी, सागर कदम, पिंटू मांडवे, दत्तात्रय बडवे, श्याम गोगाव,अमोल आटकळे, शहाजी शिंदे, शैलेश कदम आदी उपस्थित होते.