Viral: Live TV Debate दरम्यान बोलण्याची संधी मिळाली नाही, म्हणून महिला मध्येच उठली आणि लागली नाचू

0

सोशल मीडिया, इंटरनेटवर काय काय व्हायरल होऊ शकते हे सांगता येत नाही. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. यात पशू पक्षी ते मानवा पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. इंटरनेट अशा व्हिडिओंनी भरलेले आहे, जे पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होतो. नुकतेच ऑस्ट्रेलियात एका सामन्यादरम्यान मैदानावर सॉफ्ट बॉलचा खेळाडू आपल्या मैत्रिणीला दुखापतीच्या बहाण्याने प्रपोज करताना दिसला. याशिवाय एक माणूस डिलिव्हरी मॅन असल्याची बतावणी करून नोकरी शोधताना दिसला.

आता, एका वृत्तवाहिनीवरील लाइव्ह डिबेट शोचा (Live Tv Debate) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चर्चेत सहभागी झालेल्या सदस्याला, ज्यांना बोलण्याची संधी दिली नाही, त्या महिला पाहुणीने लोकांचे लक्ष वेधण्यासाठी धक्कादायक कृत्य केले.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लाईव्ह डिबेट दरम्यान एका महिला पॅनेलला बोलण्याची संधी दिली जात नव्हती, तेव्हा ती मध्येच उभी राहून नाचू लागली आणि विचित्र हावभाव करू लागली. जेणेकरून लोकांचे लक्ष तिच्याकडे जाईल.

पॅनेलची सदस्य बोलण्याचा प्रयत्न करत असताना तिला चर्चेत सहभागी न्यूज अँकर आणि इतर पाहुण्यांनी थांबवले, त्यामुळे महिला पाहुणीकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग उरला नाही, म्हणून तिने थेट मधेच उठून नाचायला सुरुवात केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, लोक या व्हिडिओवर मजेशीर कमेंटही करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here