सोलापूर,दि.4: श्री सिध्देश्वर सहकारी कारखान्याचे संचालक धर्मराज काडादी यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. काडादी यांना संगणक (Computer) हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. माजी आमदार दिलीप माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (UBT) अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात आता धर्मराज काडादी आणि भाजपचे उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांच्यात लढत होणार आहे. काडादी यांना दिलीप माने हे पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. श्री सिध्देश्वर सहकारी कारखान्याच्या सभासदांची संख्या सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात जास्त आहे.
सोलापूर,दि.4: माजी आमदार दिलीप माने यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. माने यांनी धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून श्री सिध्देश्वर सहकारी कारखान्याचे संचालक धर्मराज काडादी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. धर्मराज काडादी यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (UBT) अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अर्ज माघार घेण्यासाठी आज 4 नोव्हेंबरपर्यंतची मुदत होती. दिलीप माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आता दक्षिण विधानसभा मतदारसंघात धर्मराज काडादी आणि भाजपाचे सुभाष देशमुख यांच्यात लढत होणार आहे.
भाजपा नेत्या माजी महापौर शोभाताई बनशेट्टी (Shobha Tai Banshetti) मोठा निर्णय घेतला आहे. शोभाताई यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.