“माझी आणि मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करा” धनंजय मुंडे 

0
“माझी आणि मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करा” धनंजय मुंडे

सोलापूर,दि.७: राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते धनंजय मुंडे यांनी, ”माझी आणि मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करा, ब्रेन मॅपिंग करा” अशी मागणी केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट उघड झाला आहे. याप्रकरणी आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यावरून जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

जरांगे पाटील यांच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आली होती. मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आहे. धनंजय मुंडे यांनी आपली हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. 

काय म्हणाले धनंजय मुंडे? | Dhananjay Munde On Manoj Jarange Patil 

धनंजय मुंडे यांनी या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली आहे. तसेच माझी ब्रेन मॅपिग, नार्को टेस्ट करा जरांगे आणि आरोपींचीही करा. सत्य काय आहे? ते समोर येईल असे मुंडे म्हणाले. माझे आणि जरांगेचं काहीही वैर नाही. मी मराठा आंदोलनाला मदत केली आहे. आज एआयने सर्व काही करता येते, माझा फोन नेहमी सुरू असतो. कुणाचीही अडचण सोडवण्यासाठी मी फोन सुरू ठेवत असतो. मनोज जरांगे हे तुम्हाला सगळे महागात पडणार आहे, मला ठराविक जातीच्या व्यासपीठावरुन लाथा मारून बाहेर काढले होते, मराठा आरक्षणात 500 जणांचा जीव गेला, हे ईडब्लूएसमधून वाचले असते, असेही मुंडेंनी म्हटले.

वाळूचे ट्रक पकडले…

तुमच्या मेहुण्याचे किती वाळूचे ट्रक पकडले गेले, पण माझ्यावर असे काही करायचे संस्कार नाहीत. तुम्ही ओबीसीच घेऊ नका, ईडब्लूएसमधून घ्या. मनोज जरांगेना आता शेतकरी नेता व्हायचं आहे, वंजारी जातीचे बीज ठेवायचे नाही ही धमकी कोणी दिली, मला गोळ्या घाला आणि संपून टाका, फक्त तुम्ही राहा, असा टोलाही जरांगे पाटलांना लगावला.

मराठा समाजाला ओबीसीमध्ये जाऊन खरच फायदा आहे का. पुरोगामी महाराष्ट्रात हे वातावरण कोणी तयार केलं. आपल्याला एकत्र येऊन गावागावात निर्माण झालेला सामाजिक तडा सोडवावा लागेल.  घर जाळणारी पिल्लावळ जन्माला आलीयत ती कोणाची आहेत. तलवारीनं मला मारायाला आलेले मी त्यांची गळाभेट करुन त्यांना चहा पाजला. जरांगेंनी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. ईडब्ल्यूएस की ओबीसीमध्ये जास्त आरक्षण मिळतं? तारीख तुम्ही सांगा, धनंजय मुंडे म्हणाले. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी…

गोपीनाथ मुंडे आणि अण्णांच्या संस्काराने मी घडलो आहे. जात पात धर्म हे पाहून राजकारण केलेले नाही. मी ज्या जातीत जन्माला आलोय त्यापेक्षा इतर जातीतील माझे सहकारी आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मी सर्वप्रथम बीड जिल्हा परिषदेत ठराव मांडला होता. यामुळेच ठिकठिकाणी एक नवीन चळवळ उभी राहिली. यानंतर मग मराठा आरक्षणाचे ठराव सर्व ठिकाणी होऊ लागले. ज्या ज्यावेळी मराठा समाजाचे आंदोलन झाले, त्या प्रत्येक आंदोलनात मी सहभागी होतो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here