मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरसाठी घेतला हा निर्णय

0

मुंबई,दि.८: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सोलापुरसाच्या (Solapur) पाणीपुरवठा योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अमृत २ योजनेकरिता ८०० कोटी रुपयांचा प्रस्ताव महानगरपालिकेने त्वरित पाठवावा. यातील हद्दवाढ भागातील पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी १०० कोटी रुपये तत्काळ वितरित करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. 

शुक्रवारी मुंबईत सोलापूरच्या पाणीपुरवठाबाबत  मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठक घेतली. यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore), आमदार देवेंद्र कोठे (Devendra Kothe) यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठीच्या दुहेरी जलवाहिनीच्या कामाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. कोणत्याही परिस्थितीत ३१ मार्चपर्यंत दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण करण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी सचिवांना दिले. 

१०० कोटी रुपये तत्काळ वितरित करण्यात येतील

पाकणी येथील जलशुद्धीकरणासाठीची जागा मनपाला देण्याबाबत वन सचिवांना सूचनादेखील दिल्या. दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अतिरिक्त टाक्या, शहरांतर्गत नव्या जलवाहिनी तसेच इतर कामे अमृत २ योजनेतून करण्याकरिता महापालिकेने त्वरित ८०० कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवावा. यातील शहराच्या हद्दवाढ भागातील पिण्याच्या टाक्या बांधण्यासाठी १०० कोटी रुपये सोलापूर महानगरपालिकेसाठी तत्काळ वितरित करण्यात येतील. तसेच उर्वरित निधीही देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सांगितले. 

सोलापूर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर

सोलापूर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असून या शहराच्या विकासासाठी विशेषतः पाणीपुरवठ्यासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागात अतिरिक्त टाक्या, जलवाहिनी आदी कामे करण्यासाठी आगामी काळात गतीने अंमलबजावणी होईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

आगामी काळात शहर विकासाला मोठी गती मिळेल

सोलापूर शहरवासीयांच्या मुबलक पाणीपुरवठ्याला आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सोलापूरच्या पाणीपुरवठा आणि एकूणच विकासाबाबत प्रचंड आग्रही असल्याने आगामी काळात शहर विकासाला मोठी गती मिळेल याची खात्री आहे.  आमदार देवेंद्र कोठे


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here