मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

0

मुंबई,दि.19: Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सगळं काही द्यायचे आहे. मग ते सगेसोयरे असेल, मराठा आरक्षण असेल मात्र देवेंद्र फडणवीस हे त्यांना करू देत नाही असा आरोप केला. मनोज जरांगे पाटील यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे याची मला कल्पना आहे. असे म्हणत फडणवीस यांनी जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे. 

मी राजकारणातून सन्यास घेईन | Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil

‘आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले, ते एकतर मी केले, किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेत. शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामागे मी भक्कमपण उभा राहिलोय, जाणीवपूर्वक नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना जर मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यायचा आहे, आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण करतोय असं वाटलं तर त्याच क्षणी मी राजीनामा देईन, आणि मी राजकारणातून सन्यास घेईन’ असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात. इतर सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारावर काम करत असतात. एकनाथ शिंदे आणि मी एकत्रित काम करतो. शिंदेंना पूर्ण पाठबळ आणि पाठिंबा माझा आहे. त्यामुळे जरांगेंनी केलेल्या आरोपावर एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं. मी मराठा आरक्षणाच्या मध्ये येतोय असं मुख्यमंत्री म्हणाले तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून निवृत्त होईन असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. 

त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी कुठलाही प्रयत्न केला आणि मी तो थांबवला असं शिंदेंनी सांगितले तर त्याच क्षणी मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून निवृत्त होईन. आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले ते एकतर मी केले नाहीतर शिंदेंनी केले. एकनाथ शिंदेंच्या पाठिशी मी भक्कपणाने उभा राहिलो आहे. परंतु अशाप्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंच्या आरोपावर प्रत्युत्तर दिले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here