मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण योजनेबाबत म्हणाले, पैसे…

0

मुंबई,दि.१०: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On LBY) यांनी लाडकी बहीण योजनेबाबत (LBY) एक महत्त्वाची माहिती दिली आहे. महायुती सरकारने पात्र महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रूपये मिळतात. ही रक्कम थेट महिलांच्या खात्यावर जमा केली जाते. भाजपतर्फे राखी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. 

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? Devendra Fadnavis On LBY

निवडणुकीच्या काळात महिलांना मिळणाऱ्या रक्कमेत वाढ केली जाईल असे जाहीर करण्यात आले होते. लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्षे सुरू राहील आणि सध्या मिळणारे महिन्याचे १५०० रुपये मानधन योग्यवेळी वाढविले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शनिवारी दिली.

Devendra Fadnavis On LBY

काही जणांनी योजनेचा दुरुपयोग करून घुसखोरी केली आहे. अशांचे मानधन थांबवण्यात येईल. काही ‘हुशार’ भावांनी आपला फोटो लावण्याऐवजी मोटारसायकलचा फोटो लावला, जेणेकरून ओळख पटू नये. अशा घुसखोरांचे अनुदान आता थांबविण्यात आले आहे. प्रत्येकाची पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच पात्र असूनही अन्याय झालेल्या भगिनींवरील अन्याय दूर केला जाईल, असेही फडणवीस म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here