Devendra Fadnavis On Kirit Somaiya: किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

0

मुंबई,दि.१८: Devendra Fadnavis On Kirit Somaiya: भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओवरून विधानपरिषदेतही गोंधळ झाला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना ( ठाकरे ) गट आमदार अनिल परब यांनी याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी घोषणा केली आहे. (Devendra Fadnavis On Kirit Somaiya)

देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा | Devendra Fadnavis On Kirit Somaiya

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राजकारणात अनेकवेळा असे प्रसंग येतात की त्यात माणसाचं पूर्ण राजकीय आयुष्य आणि केलेली पुण्याई पणाला लागते. पण, समोर आलेल्या प्रकरणातील काही तक्रारी असतील, तर त्याची चौकशी आम्ही करू. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही.”

“महिलेची ओळख सांगता येत नाही. तपासासाठी पोलिसांना महिलेची ओळख दिली जाईल. पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून महिलेची ओळख पटवतील. महिलेची ओळख आपण जाहीर करत नाही. त्यामुळे ती जाहीर करण्याचा प्रश्नच येत नाही. अशा प्रकारचे कोणतेही प्रकरण दाबले किंवा लपवले जाणार नाही,” अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

“सोमय्यांनी पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. याची अतिशय सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल,” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here