मुंबई,दि.२३: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात काही खुलासे केले आहेत. गेल्या आठवड्यात फडणवीस यांची मुलाखत असलेला भाग प्रकाशित झाला. आज फडणवीस यांनी या भागावर काही ट्विट केले आहेत. यामध्ये फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी कोणी शिफारस केली, या मागची स्टोरी सांगितली आहे.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटल्याची चर्चा महाराष्ट्रात होत होती. तेव्हा खरोखच देवेंद्र फडणवीस शॉक झाले होते. परंतू, शिंदेंनी मुख्यमंत्री केले म्हणून नाही, तर त्यांना प्रदेशाध्यक्ष करायचे सोडून उपमुख्यमंत्री केल्याबद्दल देवेंद्रना आश्चर्य वाटले होते. यामागचा गेम प्लॅन वेगळाच होता.
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनविण्याचा प्रस्ताव कोणी दिलेला?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनविण्याचा प्रस्ताव कोणी दिलेला? यावर फडणवीस यांनी मी आणि एकनाथ शिंदे भेटलो तेव्हा हे सरकार आपल्या विचारांना पटणारे नाही, असे एकमत झाले. मी ठरविले होते की मी मुख्यमंत्री होणार नाही. सरकार बदलण्यावर चर्चा झाली, हिंदू आणि हिंदुत्वाचा दम घुटत होता. तेव्हा मी एकनाथ शिंदे एवढे मोठे पाऊल उचलतायत तर त्यांनीच मुख्यमंत्री व्हायला हवे असे मत मांडले. दिल्लीत गेलो, वरिष्ठांना हे सांगितले. त्यांना समजावण्यात खूप वेळ गेला. माझ्या पक्षाने लगेचच माझा प्रस्ताव स्वीकारला नाही, असे फडणवीस म्हणाले.
एकनाथ शिंदे एवढे मोठे पाऊल उचलणार आहेत, त्यांनाच नेता बनवावे यावर पक्षाचे नेते सहमत होते, परंतू ते लोकांमध्ये विश्वास निर्माण करू शकतील का? या सवालावर सारे अडले होते. परंतू, काही दिवसांनी दिल्लीतील नेत्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यावर होकार दिला, असे फडणवीस म्हणाले.
मला प्रदेशाध्यक्ष व्हायचे होते. तशी वरिष्ठांशी बोलणीही झाली होती. मी सरकारमध्ये राहणार नाही असे त्यांना सांगितले होते. प्रदेशाध्यक्ष बनून मी ती जबाबदारी पार पाडेन असे सांगितलेले. कठोर मेहनत घेऊन पुढील दोन वर्षांत पक्षाला एक नंबरला नेईन, सर्वकाही असे ठरले. पण ऐनवेळी मला उपमुख्यमंत्री करण्यात आले तेव्हा मला धक्का बसला असे फडणवीस म्हणाले.