‘भारतात छत्रपती संभाजी महाराजांचा उदो उदो होणार, औरंगजेबचा…’ देवेंद्र फडणवीस

0

अहमदनगर,दि.११: Devendra Fadnavis On Chhatrapati Sambhaji Nagar: नामांतराविरोधात आंदोलन सुरू आहे, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) धाड मारली आहे. दोन महिन्यांत ईडीने दुसऱ्यांदा धाड मारली आहे. ईडीने केलेल्या छापेमारीनंतर मुश्रीफ कार्यकर्ते ईडी, भाजपा आणि किरीट सोमय्यांविरोधात आक्रमक झाले आहेत. याबद्दल आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमानिमित्त अहमदनगरमध्ये आले होते. तेव्हा हसन मुश्रीफ यांच्या घरी पडलेल्या धाडीबाबत प्रसारमाध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारलं. त्यावर फडणवीस म्हणाले, “मला त्याची कोणतीही कल्पना नाही. माध्यमांवरच त्याबद्दल पाहिलं,” असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.

भारतात छत्रपती संभाजी महाराजांचा उदो उदो होणार | Devendra Fadnavis On Chhatrapati Sambhaji Nagar

तसेच, छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नामांतराविरोधात आंदोलन सुरू आहे. यावरती देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं, “संभाजीनगरमध्ये शांतता राहावी. आंदोलकांनी आंदोलन परत घ्यायला हवं. नामांतरासंदर्भात एक प्रक्रिया झाली. त्यातूनच हा निर्णय झाला आहे. भारतात छत्रपती संभाजी महाराजांचा उदो उदो होणार आहे. औरंगजेबचा उदो उदो होऊ शकत नाही. त्यामुळे तिथे शांतता नांदण्यासाठी जी काही कारवाई करावी लागेल, ती करू,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागल येथील निवासस्थानी आज पुन्हा एकदा ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आली. हसन मुश्रीफ यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज पहाटेच्या सुमारास ईडीचे चार ते पाच अधिकारी कागल येथील हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी छापा टाकत कागदपत्राची तपासणी सुरू केली. यामुळे सध्या एकच खळबळ उडाली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here