सोलापूर,दि.२४: Devendra Fadnavis On A Visit To Solapur Today | सोलापूर (Solapur) जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट हे पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आज बुधवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्हयातील सीना नदीकाठच्या १२४ गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात शेतीचे मोठे नुकसान झाले. शिवायअनेक कुटुंबे पूराच्या पाण्यात अडकल्याचा अंदाज आहे. पूरात अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी आणण्याचे काम प्रशासनाकडून युध्दपातळीवर सुरु करण्यात आले आहे. यासाठी सैन्याची मदतही घेण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रालयात मंत्रमडळाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी पूरस्थितीचा आढावाही घेतला. त्यांनी जिल्ह्यातील पूरस्थितीच्या पाहणीसाठी दौरा आखण्यात प्रशासनास सांगितले. त्यानुसार मंगळवारी सांयकाळी जिल्हा प्रशासनाकडुन मुख्यमंत्री यांच्या हेलीकॉफ्टरसाठी हेलीपेंडच्या उभारणीचे नियोजन करण्यात येत होते.
पालकमंत्री गोरे यांनी सांगोला,करमाळा, माढा, मोहोळ या तालुक्यातील पूरस्थितीची पाहणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासवमेत ते बुधवारी पाहणी दौऱ्यात उपस्थित राहणार आहेत. सामाजिक न्याय मंत्री सिरसाट हे देखील बुधवारी करमाळा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते सुरुवातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर या तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या मेळावा व अन्य खाजगी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मंगळवारी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते. सायंकाळी ते सोलापूरकडे रवाना झाले. बुधवारी ते दिवसभर सोलापूर जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.








