Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस पेनड्राईव्ह गौप्यस्फोट प्रकरणी नवा खुलासा

0

दि.12: Devendra Fadnavis: विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकार यंत्रणेचा दुरुपयोग करत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी लक्षवेधी मांडताना राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपा आमदार गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी सरकारी वकील, एसीपी यांच्यामार्फत सरकारने षड्यंत्र रचल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांना केला आहे. सरकार पोलिसांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांना सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असणारा पेनड्राईव्हही सुपूर्द केला.

विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप असलेल्या व्हिडिओचा पेनड्राइव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला होता. मविआला अडचणीत आणण्याऱ्या पेन ड्राईव्ह प्रकरणात आता नवा खुलासा करण्यात आला आहे, पेनड्राईव्ह प्रकरणात पत्रकार आणि पोलीस कॉंस्टेबलचाही समावेश असल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहे.

पत्रकार आणि पोलीस कॉंस्टेबलचाही समावेश?

राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा घणाघाती आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात खळबळ उडवून दिली होती. पेनड्राईव्ह प्रकरणात पुण्यातील पत्रकार आणि पोलीस कॉंस्टेबलचाही समावेश असल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहे, स्टिंग ऑपरेशनमध्ये तेजस मोरेसह एका पोलीस कॉन्स्टेबलचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

फडणवीस यांचे गंभीर आरोप

राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा घणाघाती आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात खळबळ उडवून दिली. विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप असलेल्या व्हिडिओचा पेनड्राइव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला. गिरीश महाजनांच्या विरोधात गुन्हा कसा नोंद करायचा यापासून ते बरंच काही या कार्यालयात ठरलं. एफआयआर नोंद करणे आणि खोटे साक्षीदार तयार करण्याचं काम सरकारी वकिलांनी केलं. साक्षी कशा घ्यायच्या त्यापासून पैसे कसे घ्यायचे याचा सर्व घटनाक्रम या व्हिडीओत असल्याचे त्यांनी म्हटले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here