Devendra Fadnavis: दाऊदविरोधात लढतोय, मुंबईविरोधात नाही: देवेंद्र फडणवीस

0

मुंबई,दि.9: Devendra Fadnavis: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी ईडीकडून (ED) अटक झाल्यानंतर त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर भाजपाकडून (BJP) नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र करण्यात आली आहे. मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आज मुंबईत (Mumbai) मोर्चा काढला आहे. आझाद मैदानातून (Azad Maidan) या मोर्चाला सुरुवात झाली आहे. नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप (BJP) आक्रमक झालीय. ठाकरे सरकारकडून मलिकांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी आज मुंबईत विराट मोर्चा काढण्यात आला आहे.

नवाब मलिक(Nawab Malik) आणि दहशतवाद्यांचा जो जमीन व्यवहार झाला त्यामागे सूत्रधार दाऊदची बहीण हसीना पारकर ही होती. या पैशाचा वापर मुंबईत 3 बॉम्बस्फोट घडवण्यासाठी झाला. काळ्या पैशातून जमीन खरेदी करून टेरर फंडिंग केले गेले. या टेरर फंडिंगमध्ये महाराष्ट्रातलं मंत्री मदत करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तुम्हाला एकदिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यावं लागेल. कुणाच्या दाढ्या कुरवाळताय? तुम्ही मलिकांचा राजीनामा घेतला नाही, तरी आमचा संघर्ष सुरूच राहील असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.  

हेही वाचा Sharad Pawar: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात केला मोठा गौप्यस्फोट

दाऊदविरोधात लढतोय, मुंबईविरोधात नाही

नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. काल आम्ही तुमचं पितळ उघडं केलंय. मोदींना संपवण्याकरीता तुम्ही सर्व एकत्र येता आहात. आमचे संबंधी गुन्हेगारांशी नाही. कालचा बाॅम्ब पहिला बाॅम्ब आहे. अजून अनेक बाॅम्ब येतील. आपला संघर्ष पोलिसांशी नाही. पोलिसांनी अटक केली तर काही होत नाही. शांत राहा. यांनी राजीनामा घेतला नाही तर अजून अनेक गोष्टी बाकी आहे, अजून संघर्ष बाकी आहे. रस्ता रोको करायचा नाही. आपण दाऊदविरोधात लढतोय, मुंबईविरोधात नाहीदाऊदच्या गुंडाविरोधात हा संघर्ष आहे. 1993 साली मुंबईत 13 बॉम्बस्फोट झाले, त्यावेळी हसीना पारकर, सलीम पटेलनं षडयंत्र रचलं. मलिकांनी आरोपीकडून जमीन विकत घेतली. 25 रु चौरस फुटाने ही जमीन विकत घेतली, हसीना पारकरने बॉंम्बस्फोटाचा कट रचला. ईडीजवळ मलिकांवरोधात पुरावे आहेत. दाऊदच्या माणसाचा राजीनामा घेतलाच पाहिजे असे मागणी फडणवीसांनी केलीय.

“कुणाच्या दाढ्या कुरवाळताय?”

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरून निशाणा साधला. “जर अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला जातो, संजय राठोडांचा राजीनामा घेतला जातो, तर दाऊदच्या माणसाचा राजीनामा का नाही? कुणाच्या दाढ्या कुरवाळताय म्हणून तुम्ही राजीनामा घेत नाहीत?”, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

भाजपाकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आझाज मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार अशा भाजपाच्या इतरही ज्येष्ठ नेत्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here