Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस नोटीस प्रकरण, यामुळे देवेंद्र फडणवीस पोलीस स्टेशनला जाणार नाहीत

0

मुंबई,दि.१२: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नोटीस पाठवली आहे. फडणवीस यांना उद्या (दि.१३) सकाळी ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला बोलावण्यात आले आहे. मी निश्चितपणे उद्या तिथे जाणार आहे. असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र आता फडणवीस उद्या बीकेसी पोलीस स्टेशनला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ट्वीट करून याबाबत खुलासा केला आहे.

“सहपोलिस आयुक्त, गुन्हे यांचा दूरध्वनी मला आत्ता आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलीस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ. मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात. जयहिंद, जय महाराष्ट्र !” असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून सांगितलं आहे.

तर, “महाविकास आघाडीचे नवीन षडयंत्र उघडकीस केल्याने आता नोटीस येत आहे. असे असले तरी उद्या, रविवारी, १३ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता, बीकेसी, मुंबई येथील सायबर पोलिस ठाण्यात मी उपस्थित राहीन.” असं या अगोदर फडणवीस यांनी ट्वीटद्वारे सांगितलं होतं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here