Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: युक्रेनचे झेलेन्स्की यांनी नेटोऐवजी आमच्या मुख्यमंत्र्यांची मदत मागितली असती तर: देवेंद्र फडणवीस

0

मुंबई,दि.२५: Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी भाजपावर (BJP) जोरदार टीका केली आहे. भाजपकडून करण्यात आलेल्या प्रत्येक आरोपाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) चोख प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांचा सकाळच्या सत्तेचा प्रयोग यशस्वी ठरला असता तर आज नवाब मलिक आणि अनिल देशमुख भाजप नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसले असते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात ईडीच्या सुरू असलेल्या कारवाई संदर्भात उद्धव ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले.

विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपच्या आरोपांचा समाचार घेतला. त्यावर प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस (Devendra Fadnavis) यांनी संजय राऊतांच्या (Sanjay Raut) माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. तुमच्या घरगड्यांना ईडी बोलत आहेत म्हणून तुम्हाला ते घरगडी वाटत आहे का? असा सवालही फडणवीसांनी (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray) केला.

“युक्रेनचे अध्यक्ष हे झेलेन्स्की हे नेटोची मदत मागत आहेत. जर झेलेन्स्की यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांची मदत मागितली असती तर जास्त बरं झालं असतं. कारण मुख्यमंत्र्यांकडे असा एक बॉम्ब आहे जो सर्वांवर भारी आहे तो म्हणजे टोमणे बॉम्ब. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात टोमण्यांव्यतिरिक्त काय आहे? हे अरण्यरुदन होतं. मुख्यमंत्र्यांची राज पर पेहराव है, जखम बहोत गेहरा है लगता है बडी चोट खायी है, दर्द बनके बाते जबान पै आई है अशा प्रकारची अवस्था होती. मराठी शाळा बंद झाल्याचे आपण सांगितले नाही. ३८६ कोटी रुपये बंद शाळांवर खर्च केले याबद्द आपण बोलला नाहीत. मुख्यमंत्री नवाब मलिकांचे समर्थन करत आहेत याचे मला मनातून दुःख आहे. नवाब मलिकांनी दाऊदच्या माणसाकडून जमीन खरेदी करणे याचं समर्थन कसे केले जाऊ शकते? इतके वर्षे त्यांच्यासोबत राहिल्यानंतर अशा गोष्टींचे ते समर्थन करतात याचे मला अतिशय दुःख आहे,” असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray) यांनी म्हटले.

“आम्ही पारदर्शी कारभार केला म्हणून आरशासमोर उभे राहू शकतो. तुमच्या घरगड्यांना ईडी बोलत आहेत म्हणून तुम्हाला असं वाटत आहे का? उद्या कोण आणि परवा कोण हे कोणीच घोषित करु नये. पण ही अक्कल संजय राऊतांना देणार आहात का? त्यांनीही बाप बेटा जेलमध्ये जाणार असे घोषित केले ना. महाराष्ट्रावर टीका करत आहोत हा संभ्रम तुम्ही मनातून काढून टाका. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र, तुम्ही म्हणजे मराठी आणि तुम्ही म्हणजे मुंबई नाही. पंतप्रधान मोदींसोबत आपण मते मागितली आणि मग सत्तेसाठी कोणत्या शकुनीच्या नादी लागलात. शिखंडीला पुढे करणारी ही औलाद नाही. कपटाने राज्य कौरवांनी घेतले होते. त्यावेळी अर्जुन घाबरला नाही आणि आता आम्हीही घाबरणार नाही,” असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here