उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भर सभेत याकरिता मागितली माफी

0

सातारा,दि.25 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. तडाखेबाज भाषणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार कायम चर्चेत असतात. साताऱ्यातील एका कार्यक्रमात याचा प्रत्यय आला. आज साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलत असताना चुकून पालकमंत्री म्हणण्याऐवजी जिल्हाधिकारी उल्लेख केल्यामुळे अजितदादांनी धरणाच्या वक्तव्याचा दाखला देत जाहीर सभेत माफी मागितली.

उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील वडूज येथील कोव्हिड हॉस्पिटलचे उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते पार पडलं. यावेळी बोलत असताना अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली.

‘मी पाच वर्षे इथं जिल्हाधिकारी म्हणून काम केलं असल्यामुळे अनेक जिवाभावाचे सहकारी लाभले आहे. पालकमंत्र्यांच्या नात्याने आपल्या भेटीगाठी होत होत्या. शेतकऱ्यांनी शेतीकडे लक्ष दिले पाहिजे, पण हवामान खात्याचे अंदाज हे सारखे चुकत आहे, असं म्हणत असताना अजित पवार पालकमंत्र्यांऐवजी जिल्हाधिकारी म्हणाले होते.

त्यामुळे अजित पवारांचं भाषण सुरू असताना त्यांच्या विधानामध्ये सुधारणा करत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी त्यांना एक चिट्ठी पाठवली आणि जिल्हाधिकारी नव्हे तर पालकमंत्री असं हवं असं सांगितलं.

अजित पवारांनी भाषण सुरू असताना चिठ्ठी वाचली आणि जिल्हाधिकारी म्हणालो का, आता एवढं कुठं शिकलोय मी, मी आपला पालकमंत्री होतो. खूप दिवसांनी एवढीशी चूक झाली हो, मागे फार मोठी चूक झाली होती, त्याची खूप मोठी किंमत चुकवली होती. तेंव्हापासून कानाला खडा लावला. चव्हाण साहेबांच्या समाधी पुढे बसलो आणि साहेब चुकलो, साहेब चुकलो, असं म्हणालो, अजितदादा असं म्हणताच सभेत एकच हश्शा पिकली.

त्यानंतर अजित पवार यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे बघून हात जोडत साहेब चुकलं असं म्हणत चुकीची कबुली दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here