Delhi : रोहिणी कोर्टात कमी तीव्रतेचा स्फोट, स्फोटक साहित्य सापडले, एक पोलिस जखमी

0

Delhi Rohini Court blast : दिल्लीतील (Delhi) रोहिणी कोर्टात (Rohini Court) आज सकाळी स्फोटाच्या (Explosion) आवाजाने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या स्फोटात (Explosion) न्यायालय क्रमांक 102 चे नायब (पोलीस) जखमी झाले आहेत. जखमी पोलिसाला रुग्णवाहिकेच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हा कमी तीव्रतेचा स्फोट (Low Intensity Explosion) असल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटामुळे (Explosion) जमिनीत खड्डा पडला आहे. हा एक प्रकारचा क्रूड बॉम्ब (Crude Bomb) आहे. घटनास्थळावरून आयईडी, स्फोटक आणि टिफिनसारखी वस्तू सापडली आहे. दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल तपास करत आहे. एनएसजीलाही (NSG) घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. (Delhi Rohini Court blast)

माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. घटनेची माहिती मिळताच रोहिणी जिल्ह्याचे डीसीपी आणि एसीपी आरती शर्मा टीम फोर्ससह रोहिणी कोर्टात दाखल झाल्या. तेथे पोहोचताच पोलिस पथकाने घटनेचा तपास सुरू केला. स्फोटानंतर लोकांनी गोळीबार झाल्याची अफवा पसरवली. त्यामुळे संपूर्ण कोर्टात एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही (Forensic Expert) पाचारण केले आहे.

त्याचवेळी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे पथकही स्फोटाच्या तपासासाठी रोहिणी न्यायालयात पोहोचले आहे. विशेष म्हणजे नुकतीच हल्लेखोरांनी रोहिणी न्यायालयात हत्येची घटना घडवली होती. कोर्टात एका गुंडाची बदमाशांनी गोळ्या घालून हत्या केली. यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांना घटनास्थळीच जेरबंद केले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here