सांगोला पोलीसांकडून एकास पंजाब मधून अटक
सांगोला,दि.२२: लुडो गेम खेळत असताना चॅटिंग करून विश्वास निर्माण करत मुलीचा मोबाईल नंबर घेऊन तिला व्हिडीओ कॉल करत अश्लील व्हिडीओ बनवून, सदर व्हिडीओ सोशल मीडियावर पाठवून बदनामी केल्याप्रकरणी दिनांक ६ सप्टेंबर रोजी सांगोला पोलीसात एका युवका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी नरळे वाडी ता. सांगोला येथील एका मुलीने पोलीसात फिर्याद दिली होती. सदर प्रकरणातील आरोपी अमनदिप करम सिंग (वय २३, रा . लखना थापा ता. पट्टी जि. तरण तारण, पंजाब) याला पंजाब येथून सांगोला पोलीसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ६ सप्टेंबर रोजी नरळेवाडी येथील फिर्यादी एका मुलीचा लुडो गेम खेळत असताना चॅट करून तिचा विश्वास संपादन करून तिचा मोबाईल नंबर घेऊन आरोपी नामे अमनदिप सिंग रा. पंजाब याने तिच्याशी मैत्री संपादन करून तो व्हॉटसऍप, इंस्टाग्राम या सोशल मिडीयाव्दारे तिला व्हिडीओ कॉल करत असे. तो रेकॉर्ड करायचा आरोपी याने फिर्यादीस ‘तु कपडे काढून समोर ये’ असा वारंवार तिला व्हिडीओ कॉलव्दारे बोलायचा.
ती पुर्ण कपडे काडत नसल्याने आरोपी हा बाथरूम मध्ये जाऊन तिला व्हिडीओ कॉल करून त्याची पॅन्ट खाली करून अश्लिल व्हिडीओ तयार करू लागला व तयार केलेले व्हिडीओ तो फिर्यादीचे नातेवाईक, यु -टयुब, इंस्टाग्राम व कॉलेज मधील ग्रुपवरती त्याने ते पाठऊन फिर्यादीची बदनामी केली आहे, अशी फिर्याद दिल्याने पोलीस ठाणे गु.र.नं. ११२६ / २०२१ भादवि कलम ३५४,३५४ ( अ ) , ३५४ ( ड ) , सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७,६७ ( अ ) नुसार सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सांगोला पोलीसांनी कौशल्याने तांत्रिकदृष्टया तपास करून सदर गुन्हयातील आरोपी नामें अमनदिप करम सिंग यास पंजाब राज्यात जाऊन त्याचा शोध घेवून अटक केली.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामिण तेजस्वी सातपुते, हिंमतराव जाधव (अप्पर पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामिण), राजश्री पाटील( उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा) यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सुहास जगताप हे तपास करीत असून सदर गुन्हयाचे तपासकामी पो.स.ई संदेश नाळे , पो.हे.कॉ.दत्तात्रय वजाळे, पो.ना. अभिजीत मोहोळकर , पो.ना. सुखदेव गंगणे , पो.ना. बाबासाहेब पाटील, सायबर पोलीस ठाणे कडील पो.कॉ. अन्वर अतार हे मदत करत आहेत.