Deepali Sayed: शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांचं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठं विधानं

0

मुंबई,दि.17: शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी मोठं विधानं केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे 40 आमदार गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. शिवसेनेचे अनेक नगरसेवक शिंदे गटात सामिल होत आहेत. शिंदे गटातील अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आमचे नेते आहेत असे म्हटले आहे. मात्र या आमदारांनी एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचे म्हटले.

राज्यातील राजकीय घडामोडीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री असतील मी मंत्रिमंडळात सहभागी नसेन असं विधान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यानंतर काही तासातच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांच्या निर्णयाला बदलून त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा निर्णय देवेंद्र फडणवीसांना कळवण्यात आला. यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. यानंतर आता शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करायला एकत्र येणार असं म्हटलं आहे. 

शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून य़ाबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच भाजपा नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद असं म्हणत भाजपाचे देखील आभार मानले आहेत. “येत्या दोन दिवसांत आदरणीय उद्धवसाहेब आणि आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार, हे ऐकून खूप बरं वाटलं. शिंदेसाहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धवसाहेबांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली, हे स्पष्ट झालं. या मध्यस्थी करता भाजपा नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद. चर्चेच्या ठिकाणाची प्रतिक्षा असेल” असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांच्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट होणार का? आणि या भेटीनंतर नेमकं काय होणार? य़ाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वी देखील दीपाली यांनी एक ट्विट केलं होतं. यामध्ये “मला एकनाथ शिंदे साहेब कालही आदरणीय होते, आजही आदरणीय आहेत आणि उद्याही राहतील. पण शिवसेनेच्या आमदारांना ढाल समजून किरीट सोमय्या आणि भाजपाचे अन्य दोन वाचाळवीर उद्धव साहेब आणि शिवसेनेवर टीका करतील. तर त्यांना एवढंच सांगणे आहे की आमच्यातील शिवसेना आजही जिवंत आहे” असं म्हटलं होतं. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here