दीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबाबत खळबळजनक दावा

0

मुंबई,दि.८: दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबाबत खळबळजनक दावा केला आहे. आदित्य ठाकरेंकडे एक टीम आहे जी त्यांना खोटं कसं बोलायचे ते शिकवते. मुंबईचा पैसा कुणी लुटला हे जनतेला माहिती आहे. ठाकरे कुटुंबाबद्दल मला आदर आहे. मी कधीही त्यांच्याबद्दल बोलत नाही. परंतु किती मंत्र्यांकडून किती पैसे मागितले, जे पैसे देऊ शकले नाहीत त्यांना मंत्रिपदावरून कसे काढले हेसुद्धा मला माहिती आहे अशा शब्दात मंत्री दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

दीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबाबत खळबळजनक दावा

दीपक केसरकर म्हणाले की, खोकेबहाद्दारांनी असे बोलणे चुकीचे आहे. शेवटी नैतिकता असते. जेव्हा नैतिकता सोडली जाते तेव्हा लोकांच्या संयमांचा बांधही तुटतो. तो आणि तुटायला देऊ नये. ठाकरेंच्या अनेक गोष्टी जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाहीत. सत्ता त्यांच्या डोक्यात गेली होती. सत्तेचा माज असल्याने ज्येष्ठ मंत्री, आमदारांनाही ते वेळ देत नव्हते. आदित्य ठाकरे महाराष्ट्रात कुठे आहेत हे कुणालाही माहिती नसायचे. बंगल्यात बसायचं आणि राज्य करायचं या कॅटेगिरीतील आदित्य ठाकरे आहेत असा आरोप त्यांनी केला. 

तसेच सत्ता गेल्यानंतर जो थयथयाट सुरू आहे तो महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही. लोकांची मने दुखावण्यात पाप असते. ते संजय राऊत रोज करतात. ते ठाकरे कुटुंबाशी प्रामाणिक नाहीत तर शरद पवारांची प्रामाणिक आहेत. राष्ट्रवादीसाठी काम करतात. शिवसेना फोडायचे जे काम राऊतांना राष्ट्रवादीने दिले ते त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांचे समाधान झाले असेल तर त्यांनी शांत राहणे आवश्यक आहे असा टोला केसरकरांनी राऊतांना लगावला. 

दरम्यान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्राचे वेगळे नाते आहे. आग्राहून सुटका झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना काशीत ठेवले होते. आजसुद्धा तिथे अनेक मराठी भाषिक आहेत. राम मंदिरासाठी लाकूड वापरण्यात येणार ते महाराष्ट्रातून देण्यात येत आहे. ते भाग्य वनमंत्री खात्याचा कारभार तुमच्याकडे असतानाही ते तुम्हाला लाभले नाही. आम्हाला ते भाग्य मिळाले. आम्ही चांगली कामे करतो. जनतेने निवडून दिलेले सरकार आम्ही पाडत नाही. युती म्हणून लोकांनी निवडून दिले आणि युती म्हणून सरकार चालवतोय असं प्रत्युत्तर केसरकरांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here