आमदार एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी

0

जळगाव,दि.17: आमदार एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याचे नुकतेच जाहीर केले होते. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं खळबळजनक वृत्त नुकतंच समोर आलं. खडसे यांना चार वेगवेगळ्या मोबाईलवरुन धमकीचे फोन आले. 

ZEE 24 तासने दिलेल्या वृत्तानुसार कथित स्वरुपात दाऊद आणि छोटा शकीलकडून ही धमकी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. यासंदर्भात एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. 15 आणि 16 एप्रिलला हे फोन आल्याची माहिती खडसेंनी तक्रारीत दिल्याचं कळत आहे. 

पूर्वाश्रमीचे भाजपा नेते आणि सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात कार्यरत असणारे एकनाथ खडसे हे पुन्हा स्वगृही परतणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनीच भाजपामध्ये जाणार असल्याची घोषणा केली होती.

‘परवापासून चार-पाच फोनवरून दाऊद, छोटा शकीलचं नाव घेत धमकीचे फोन मला आले. काही फोन अमेरिकेहून आले, काही उत्तर प्रदेशातून. पण हा खोडसाळपणा असावा असं सुरुवातीला मला वाटलं, पण, अमेरिकेहून आलेला फोन पाहता या प्रकरणाचं गांभीर्य जाणत आपण पोलिसांत त्याबाबतटी तक्रार दाखल केली. याआधी दाऊदच्या पत्नीशी माझं संभाषण झालं असं रेकॉर्डींग प्रक्षेपित करण्यात आलं होतं. एका व्यक्तीनं खोडसाळपणा करत संगणत तंत्राच्या माध्यमातून हे सर्व केल्याचं त्यानंतर तपासातून उघड झालं होतं. हा प्रकारही असाच असावा असं मला सुरुवातीला वाटलं’, असं एकनाथ खडसे म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here