Killer Tree: निसर्गात विविध प्रकारची झाडे असतात. मानवी जीवनात झाडांना विशेष महत्त्व आहे. झाडांपासून ऑक्सीजन मिळतो. झाडांमुळे निसर्ग सौंदर्यात भर पडते. झाडांना मानवी आयुष्यात खूप महत्त्व आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी या गरजा पुरवण्यामागे झाडांचा वाटा खूप महत्त्वाचा आहे. झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन (oxygen) मिळतो. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वनस्पती आणि झाडं महत्त्वाची असून, ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. पृथ्वीवर लाखो प्रकारच्या वनस्पती आढळतात. यातली काही झाडं मानवांसाठी फायदेशीर आहेत. अशीही काही झाडं आहेत, जी मानवी जीवनासाठी (Killer Tree) अत्यंत हानिकारक आहेत.
पृथ्वीवर अनेक विषारी वनस्पती आढळतात. काही वनस्पती इतक्या विषारी असतात, की त्यांना फक्त स्पर्श केल्यासही एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अशी कोणती वनस्पती आहे, जिच्या नुसत्या स्पर्शाने एखाद्याचा मृत्यू होईल. या वनस्पतीचं नाव होगविजा असं आहे. या वनस्पतीला ‘किलर ट्री’ (Killer Tree) असंही म्हटलं जातं.
होगविजा ही अत्यंत विषारी वनस्पती आहे.होगविजा वनस्पतीची उंची 14 फूट इतकी असते. ही वनस्पती दिसायला अतिशय आकर्षक आहे. त्यामुळे माणसं आकर्षित होतात. पण त्याला स्पर्श करण्याची चूक सहसा कोणी करत नाही.
चुकूनही कोणी स्पर्श केला तर 48 तासांच्या आत त्याचे धोकादायक परिणाम दिसतात. या वनस्पतीला स्पर्श केल्यास दृष्टी जाण्याचा धोका असतो. अवघ्या काही तासांतच संपूर्ण त्वचा जळत असल्याचं जाणवतं. हातावर फोड येतात आणि त्यानंतर तुमचा जीवही जाऊ शकतो. या वनस्पतीमध्ये ‘सेंसआइजिंग फुरानोकॉमारिंस’ नावाचं रसायन असते. हे रसायन मानवी जीवनासाठी अत्यंत घातक आहे. गंभीर बाब म्हणजे या वनस्पतीच्या बाधेवर अद्याप कोणतंही औषध तयार झालेलं नाही.
रिपोर्टनुसार ही वनस्पती फक्त ब्रिटनमधल्या लँकेशायर नदीच्या (Killer Tree In Britain) काठावरच आढळते. निसर्गात विपुलता, संपन्नता व वैविध्य आढळतं. यामुळेच तर मानवी जीवन सुखकर आहे. मानवाचा वाढता हस्तक्षेप, हवामानबदल, तापमानवाढ यामुळे पृथ्वीवरच्या अनेक वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक जाती दुर्मिळ होऊ लागल्या आहेत. आपल्या पुढच्या पिढीसाठी पर्यावरणाचा विनाश होऊ न देणं ही आपली जबाबदारी आहे.