Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिम भारतात दहशतवादी हल्ले करून दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नात

0

दि.२०: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम ( Dawood Ibrahim ) भारतात दहशतवादी हल्ले करून दहशत माजवण्याचा कट रचत असल्याचा खुलासा एनआयएने ( NIA ) केला आहे. यासाठी दाऊदने (Dawood Ibrahim) एक विशेष युनिट तयार केले आहे. याद्वारे तो दहशतवादी कारवाया पसरवत आहे. याची माहिती मिळाल्यानंतर एनआयएने दाऊद इब्राहिम आणि इतरांविरुद्ध ७ फेब्रुवारीला यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मुंबई आणि दिल्लीतील बडे राजकारणी आणि व्यापारी दाऊदच्या रडारवर असल्याची माहिती एनआयएला मिळाली आहे.

अलिकडेच, गृह मंत्रालयाने एनआयएला डी-कंपनीच्या कारवायांप्रकरणी लक्ष ठेवण्यासाठी आणि तपास सुरू करण्यास मंजुरी दिली होती. दाऊद बऱ्याच काळापासून भारतात दहशतवादी कारवाया पसरवत होता. भारतात अशांतता निर्माण करण्यासाठी संबंधित हस्तकांना हवाला मार्फत त्याने आर्थिक मदतही पुरवली आहे. त्याच्या इशाऱ्यावर ते काम करत आहेत, असे एनआयएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

लोकांची भरती

भारताच्या सुरक्षा यंत्रणा डी कंपनीच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. संपूर्ण भारतात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी अलिकडच्या काळात अनेकांची दाऊदने भरती केल्याचे सांगण्यात येत आहे. तो देशविरोधी कारवायांना प्रोत्साहन देत आहे. त्याचबरोबर विविध धार्मिक गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचाही त्याचा प्रयत्न आहे. अलिकडेच दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. आता तो ईडीच्या ताब्यात आहे. दाऊदचे नेटवर्क चालवल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here