नवी दिल्ली,दि.28: भारतासह 84 देशांतील 50 कोटी Whatsapp युजर्सचा डेटा लीक (Whatsapp Data Leak) झाला आहे. व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आजकाल व्हॉट्सॲपवर अनेकजण वेगवेगळे मेसेज पाठवत असतात. सध्या सोशल मीडिया आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. त्यातल्या त्यात व्हॉट्सॲप (Whatsapp), याशिवाय आपलं कामच होऊ शकत नाही. पण याचसंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुमारे 50 कोटी व्हॉट्सॲप युजर्सचे फोन नंबर लीक झाले असून ते ऑनलाईन विकले जात आहेत. एका सायबर न्यूजच्या रिपोर्टमधून असा दावा करण्यात आला आहे. या अहवालानुसार, हे आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या डाटा ब्रीचपैकी एक आहे.
सायबर न्यूजच्या (Cyber News) अहवालानुसार, एका लोकप्रिय हॅकिंग फोरमवर विक्रीसाठी डेटाबेसमध्ये 84 देशांतील व्हॉट्सॲप युजर्सच्या वैयक्तिक माहितीचा समावेश आहे. डेटा विकणाऱ्या व्यक्तीचा दावा आहे की, सेटमध्ये एकट्या यूएसमधील 32 दशलक्ष युजर्सच्या रेकॉर्ड्सचा समावेश आहे. याशिवाय इजिप्त, इटली, फ्रान्स, यूके, रशिया आणि भारतातील लाखो युजर्सचा डेटाही लीक झाला असून, त्याची ऑनलाइन विक्री केली जात आहे.

हॅकरनं डेटा कसा मिळवला, हे मात्र अद्याप स्पष्ट केलेलं नाही
सायबर न्यूजच्या अहवालानुसार, यूएस डेटासेट 7000 डॉलर्समध्ये उपलब्ध आहे, तर यूके डेटासेटची किंमत 2500 डॉलर्स इतकी आहे. सायबर न्यूजनं सांगितलं की, डेटा विकणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला असता त्यांनी पुरावा म्हणून 1097 क्रमांक शेअर केले. सायबर न्यूजनं हे सर्व नंबर तपासले आणि ते सर्व व्हॉट्सॲप वापरकर्त्यांचे असल्याचं आढळून आलं. दरम्यान, हॅकरनं डेटा कसा मिळवला, हे मात्र अद्याप स्पष्ट केलेलं नाही.
माहितीचा वापर ऑनलाइन फसवणुकीत केला जातो
अशी माहिती अनेकदा सायबर गुन्ह्यांसाठी वापरली जाते जसे की स्मिशिंग आणि विशिंग, ज्यामध्ये वापरकर्त्यांना मजकूर संदेश पाठवणे आणि त्यांना लिंकवर क्लिक करण्यास सांगणे समाविष्ट असते. त्यानंतर वापरकर्त्याला त्यांचे क्रेडिट कार्ड किंवा इतर वैयक्तिक तपशील प्रदान करण्यास सांगितले जाते.
ऑनलाईन फ्रॉडसाठी वापरला जातो युजर्सचा डेटा
असा डेटा अनेकदा सायबर गुन्ह्यांसाठी वापरला जातो. जसं की, स्मिशिंग आणि विशिंग. ज्यामध्ये युजर्सना मेसेज पाठवून त्यातील लिंकवर क्लिक करण्यास सांगितलं जातं. त्यानंतर युजर्सना त्यांचं क्रेडिट कार्ड किंवा इतर व्यक्तिगत तपशील प्रदान करण्यासही सांगितलं जातं.
गेल्या वर्षीही झाला होता डेटा लीक
मेटाच्या मालकीच्या प्लॅटफॉर्मवर डेटा ब्रीच होण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्यावर्षीही भारतातील 6 मिलियन रेकॉर्डसह 500 मिलियनहून अधिक फेसबुक युजर्सचा वैयक्तिक डेटा लीक झाल्याचं सांगण्यात आलं होतं. लीक झालेल्या डेटामध्ये फोन नंबर आणि इतर माहितीचा समावेश होता.