D. K. Shivakumar On Karnataka: कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार निकालानंतर म्हणाले मी…

0

बंगळुरू,दि.१३: D. K. Shivakumar On Karnataka: कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे. “काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी खूप मेहनत घेतली. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला, नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. हे सामूहिक नेतृत्वाचं फळ आहे. मी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांना विश्वास देतो की, आम्ही कर्नाटकच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू. असे डी. के. शिवकुमार म्हणाले.

हेही वाचा Sanjay Raut On Karanataka: ‘काँग्रेसचा विजय कर्नाटकमधील भाजपाचा पराभव नसून…’ संजय राऊत

D. K. Shivakumar On Karnataka | डी. के. शिवकुमार म्हणाले

मी हे कधीही विसरू शकत नाही की, या भाजपाच्या लोकांनी मला तुरुंगात टाकलं तेव्हा सोनिया गांधी मला भेटायला तुरुंगात आल्या. मी तुरुंगात राहणं पसंत केलं. हा गांधी कुटुंबाने, काँग्रेस पक्षाने आणि देशाने माझ्यावर टाकलेला विश्वास आहे, असे शिवकुमार म्हणाले.

मी सिद्धरमय्या, सर्व आमदार आणि राज्यातील माझ्या सर्व नेत्यांचे आभार मानतो. त्यांनी जबाबदारी घेऊन बुथ पातळीवर काम केलं. हे कुणा एका व्यक्तीच्या कामाचं यश नाही. मला खूप गोष्टी सांगायच्या आहेत. मी नंतर भारत जोडो भवन येथे येऊन या सर्व गोष्टींवर बोलेन.” असेही त्यांनी म्हटले आहे.

विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज शनिवारी (१३ मे) होत आहे. मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष काँग्रेसच्या बाजूचे होते. तोच कल आता मतमोजणीतही दिसून आला. यानुसार काँग्रेस बहुमताचं सरकार स्थापन करेल आणि यासह सलग एकाच पक्षाकडे सत्ता न देण्याची कर्नाटकातील ३८ वर्षे जुनी परंपरा कायम राहिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here