Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदारांचे बुडाले 250 बिलियन डॉलर, एका आठवड्यात झाले इतके नुकसान

0

Cryptocurrency : गेल्या आठवड्यात, क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) गुंतवणूकदारांचे 250 बिलियन डॉलर बुडले आहेत.  26 नोव्हेंबरपासून त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. यूएस फेडरल रिझर्व्ह बँकेच्या कठोर भूमिकेमुळे आणि कोरोनाव्हायरसचे नवीन प्रकार, ओमिक्रॉन (Omicron) यामुळे क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) मार्केटचे बाजार मूल्य 10% पेक्षा जास्त घसरले आहे.

गेल्या काही दिवसांपासून क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) मार्केटमध्ये सर्व काही ठीक चाललेले नाही. भारतातील क्रिप्टोकरन्सी विधेयकाने (Cryptocurrency Bill) आधीच बाजारपेठेवर संशय व्यक्त केला आहे, तर अनेक जागतिक घटक आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदार त्रस्त झाले आहेत. जागतिक शेअर बाजार आणि इतर क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला आहे. दरम्यान, यूएस फेडरल रिझर्व्ह बँकेच्या कठोर वृत्तीमुळे आणि कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) नवीन प्रकार, ओमिक्रॉन (Omicron) यामुळे क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) मार्केटचे बाजार मूल्य 10% पेक्षा जास्त घसरले आहे.

ब्लूमबर्गच्या (Bloomberg) अहवालानुसार, सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन (Bitcoin) जे संकेत दाखवत आहे, त्यांच्या मते, बाजार अधिक अस्थिर होणार आहे. बिटकॉइनमध्ये गेल्या आठवड्याच्या शेवटी प्रचंड अस्थिरता दिसून आली आहे. शुक्रवारनंतर ते 21 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. ऑक्टोबरमध्ये 69,000 डॉलरचा विक्रमी उच्चांक पाहणारा क्रिप्टो सोमवारी दुपारी 40,000 डॉलरच्या घसरणीवर चालू आहे.

बिटकॉइन फ्युचर्स देखील घसरत आहेत आणि अहवालानुसार, प्रमुख एक्सचेंजेसवरील निधी दर नकारात्मक झाले आहेत. म्हणजेच, शॉर्ट पोझिशनवर चालणारे गुंतवणूकदार प्रीमियम भरत आहेत. बाजारात लिक्विडेशनचा दबाव वाढला आहे.

गेल्या आठवड्यात, क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदारांचे 250 बिलियन डॉलर बुडले आहेत. 26 नोव्हेंबरपासून त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आहे.

जर क्रिप्टोकरन्सीच्या किमतींबद्दल बोलायचे झाल्यास, सोमवारी दुपारी 2 च्या सुमारास बिटकॉइन 1.96 टक्क्यांनी घसरून 39.98 लाखांच्या पातळीवर होते. इथीरियमही 3.65 टक्क्यांनी घसरून 3.34 लाख पातळीवर होता. कारडानो, रिपल, पोल्काडॉट, डॉजकॉइन यासह अनेक मोठी नाणी लाल चिन्हात चालू आहेत. टेदर और यूएसडी कॉइनमध्येच अनुक्रमे 0.66 टक्के आणि 0.81 टक्के वाढ नोंदवत होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here