भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये टोलेबाजी

0

मुंबई,दि.१९: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. यजमान भारताविरुद्ध लढतीत ५ वेळ विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. अशातच ‘एक्स’ ( ट्वीटर ) वरती भाजपा आणि काँग्रेसमध्ये टोलेबाजी सुरू आहे.

‘एक्स’ अकाउंटवर भाजपानं भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या होत्या. तेच ट्वीट रिट्वीट करत काँग्रेसनेही मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. यावर युजर्सनही मजेशीर अशा कंमेट केल्या आहेत.

काय आहे ट्वीट?

“भारतीय संघावर आमचा विश्वास आहे” असं ट्वीट भाजपानं केलं होतं. याला रिट्विट करत काँग्रेसने म्हटलं, “खरे आहे, जिंकणार तर इंडियाच.”

यावर एक युजर म्हणाला, “सवत बनली मैत्रीण”

दुसरा म्हणाला, “एकदम खरे… इंडिया जिंकणार आणि आय.एन.डी.आय आघाडीचा पराभव होणार.”

तिसरा युजर म्हणाला, “भारतीय संघ जिंकणार आहे, तुम्ही नाही.”

आणखी एक युजरने म्हटलं, “हे देवा यंदा भारतीय संघाला विश्वषचक जिंकू दे. याच्या बदल्यात २०२४ च्या निवडणुकीत आय.एन.डी.आय आघाडीचा पराभव करा.”

सत्ताधारी एनडीएविरुद्ध विरोधी पक्षांनी एकत्र येत नव्या आघाडीची स्थापना केली होती. या आघाडीला ‘इंडिया’ असं नाव देण्यात आलं होतं. यावरूनच काँग्रेसने भाजपाला टोला लगावला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here