Crime News: मदरशाच्या मुफ्तीनी 11 वर्षाच्या मुलासोबत केले दुष्कर्म, मुलाने सांगितली 7 महिन्यांची शोकांतिका

0

दि.8: Crime News : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका मदरशाच्या मुफ्तीनं 11 वर्षांच्या मुलावर दुष्कर्म केले आहे. हे प्रकरण मवाना शहरातील आहे. मदरशाचे मुफ्ती शिक्षणाच्या नावाखाली राहणाऱ्या मुलावर अत्याचार करत होते, असा आरोप आहे. ईदनिमित्त घरी गेलेल्या एका 11 वर्षाच्या मुलाने 7 महिन्यांच्या वेदना कुटुंबीयांना सांगितल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

पीडित मुलाच्या वडिलांनी शनिवारी पोलीस ठाणे गाठून आरोपी मुफ्तीविरोधात तक्रार दाखल केली. दुसरीकडे, इतरही अनेक मुलांवर अत्याचार केल्याचं समोर आले आहे, मात्र ती अद्याप घरून परतलेली नाहीत. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सध्या आरोपी मुफ्ती फरार आहे.

मुफ्ती अब्दुल कलाम हा मेरठमधील मवाना येथील इकराम नगर फरीद कॉलनी येथील मदरशाचे संचालक आहे. तो सातला येथील रहिवासी आहे. तो मुलांना प्रशिक्षण देतो. या मदरशात आजूबाजूच्या सोबतच इतर अनेक जिल्ह्यातील मुलंही राहून शिक्षण घेत आहेत, यामध्ये मूळचा सहारनपूरचा एक पीडित मुलगाही आहे. तो 7 महिन्यांपूर्वी मदरशात शिकण्यासाठी आला होता. 

ईदनिमित्त पीडित मुलगा घरी गेला असता त्याने कुटुंबीयांना आरोपी मुफ्तींचे कृत्य सांगितले. सण संपल्यानंतर शनिवारी दुपारी मुलाचे कुटुंबीय त्याला घेऊन मदरशात गेले, मात्र तेथे आरोप खोटे असल्याचे सांगण्यात आले.

अखेर हे प्रकरण सायंकाळी उशिरा पोलीस ठाण्यात पोहोचले. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. याप्रकरणी मुफ्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अजून मुले परत आल्यानंतर सर्वांची चौकशी केली जाईल. यामध्ये आणखी मुलांवर अत्याचार करण्यात आल्याची शक्यता आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here