Cow And Calf Viral Video: गाय आणि तिच्या वासराला आवडते पाणीपुरी

0

सोलापूर,दि.2: Cow And Calf Viral Video: गोलगप्पे (Golgappe) म्हणजेच पाणीपुरी (Panipuri) फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही खूप आवडते. नुकताच व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून याचा अंदाज बांधता येतो. ज्यामध्ये रस्त्यावर फिरणारी गाय आणि तिची वासरू मोठ्या आवडीने पाणीपुरी खात आहेत. एवढ्या चवीने पाणीपुरी खाताना प्राणी तुम्ही क्वचितच पाहिले असेल. हा व्हिडीओ जुना आहे, पण पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. (Cow And Calf Viral Video)

चवीची चटकदार पाणीपुरी प्रत्येकजण अगदी आवडीने खातो. तुम्ही अनेकदा दुकानांत, स्टॉलवर, मॉलमध्ये पाणीपुरी खाणाऱ्यांची गर्दी पाहिली असेल. पण, या गर्दीत तुम्ही कधी एखाद्या प्राण्याला पाणीपुरी खाताना पाहिलं आहे का?

ट्विटरवर शेअर केलेल्या या रंजक व्हिडीओमध्ये तुम्हाला एक गाय आणि तिचे वासरू पाणीपुरी खाताना दिसत आहे. हा व्हिडीओ रेड हिल कॉन्व्हेंट स्कूल, लखनौजवळ मोबाईलमध्ये कैद करण्यात आला आहे. या व्हिडीओला यूजर्सकडून खूप पसंतीही मिळतेय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

गोलगप्पा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात, जसे की पाणीपुरी, बताशा, पुचका, फुलकी, गुपचूप इ. पाणीपुरीचे नाव घेताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते, मात्र नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाणीपुरीची चव माणसांना नाही तर गाय घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मनोरंजक व्हिडिओमध्ये एक माणूस गाय आणि तिच्या वासराला पाणीपुरी खाऊ घालताना दिसत आहे. व्हिडीओमध्‍ये तुम्‍हाला दिसेल की आई-मुल दोघंही पाणीपुरी खाताना आपल्या नंबरची वाट पाहत आहेत.

झारखंडचे उपजिल्हाधिकारी संजय कुमार यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिले आहे की, “जर आई आणि मुलगी एकत्र असतील आणि पाणीपुरीचं दुकान असेल, तर पुढे काय म्हणावं?” या व्हिडीओला 8 हजारांहून अधिक यूजर्सनी लाईक केले आहे. तर, 1 हजाराहून अधिक लोकांनी या व्हिडीओला रिट्विट केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here