नवी दिल्ली,दि.२: Covid Vaccine Heart Attack इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि AIIMS यांनी केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की कोविड-१९ नंतर प्रौढांमध्ये अचानक होणाऱ्या मृत्यूंचा कोरोना लसीशी कोणताही संबंध नाही.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असेही स्पष्ट केले आहे की तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आणि कोरोना लस यांचा कोणताही संबंध नाही. मंत्रालयाचे म्हणणे आहे की आयसीएमआरने केलेल्या अभ्यासात कोरोना लस आणि हृदयविकाराचा झटका यांच्यात कोणताही संबंध आढळला नाही. (Covid Vaccine Heart Attack News)

हा अभ्यास अशा वेळी करण्यात आला आहे जेव्हा देशभरात तरुणांमध्ये हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. आयसीएमआर आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र या अचानक होणाऱ्या मृत्यूंमागील कारण समजून घेण्यासाठी काम करत आहेत. या अभ्यासात, जीवनशैली आणि मागील परिस्थिती हे अचानक होणाऱ्या मृत्यूंचे मुख्य कारण मानले गेले आहे.