Covid-19: WHO ने कोरोनासाठी दोन नवीन उपचारांना दिली मान्यता, संधिवात औषधाचाही समावेश

0

सोलापूर,दि.14: Corona Medicine: जगभरात कोरोनाचे (Covid-19) रुग्ण सातत्याने वाढत आहेत. यावर उपाय म्हणून लसीकरणाचे (Vaccination) काम जोरात सुरू आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (Word Health Organization) दोन नवीन कोरोना उपचारांना मान्यता दिली आहे. ब्रिटीश मेडिकल जर्नल द बीएमजेनुसार (The BMJ), डब्ल्यूएचओ तज्ञांनी सांगितले की कॉर्टिकोस्टिरॉईड्ससह (corticosteroids) वापरलेले संधिवात औषध बॅरिसिटिनिब (baricitinib) गंभीर कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी चांगले सिद्ध झाले आणि व्हेंटिलेटरची गरज कमी झाली.

याशिवाय तज्ञांनी सिंथेटिक अँटीबॉडी उपचार (synthetic antibody treatment) सोट्रोविमाबची (Sotrovimab) शिफारस केली आहे. हे वृद्ध आणि मधुमेहासारख्या जुनाट आजारांसाठी प्रभावी ठरू शकते. कॉर्टिकोस्टिरॉईड्स स्वस्त आणि सहज उपलब्ध आहेत. जे सामान्यतः सूज आणि गंभीर प्रकरणांमध्ये वापरले जाते.

संधिवात औषधे tocilizumab (टोसिलिझुमॅब) आणि sarilumab (सरिलुमॅब) यांना जुलैमध्ये WHO ने मान्यता दिली होती. सिंथेटिक अँटीबॉडी उपचार Regeneron (रेजेनेरॉनला) WHO ने सप्टेंबरमध्ये मान्यता दिली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here