वसईच्या व्यापाऱ्याचा फसवणूक प्रकरणी न्यायालयाने जामीन फेटाळला

0

सोलापूर,दि.१८: सोलापूर येथील चादर कारखानदार नम्रता गोविंद भंडारी ( महेश नगर कारंबा नाका ) या चादर कारखानदाराची फसवणूक केल्याप्रकरणी वसई येथील कापड व्यापारी रमेश शांतीलाल भटारिया याचा जामीन अर्ज सत्र न्यायाधीश पाटवदकर यांनी फेटाळून लावला. २००८ मध्ये आरोपी फिर्यादी रमेशची भेट घेतली. देश – विदेशात आर. किशोरकुमार ॲन्ड कंपनीचे नाव असून, माझ्याशी व्यापार केला तर तुमचा फायदा होईल असे सांगून ३५० चादरी, ४० बेडसीटची ऑर्डर दिली.

भविष्यात पैसे देतो असे सांगून तो टाळाटाळ करू लागला. नंतर फिर्यादीस उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. अखेर नम्रता भंडारी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद नोंदवली. गेल्या महिन्यात त्याला अटक झाली. आरोपीने जामिनासाठी अर्ज केला. त्या अर्जास मूळ फिर्यादीचे वकील अभिजित इटकर यांनी हरकत घेतली.

आरोपीने किती रकमेची फसवणूक केली हे न पाहता त्याची गुन्हा करण्याची मानसिकता पाहावी. फसवणुकीची रक्कम भरली म्हणून जामीन मिळण्याचा अधिकार त्याला प्राप्त होत नसल्याचा युक्तिवाद ॲड. इटकर यांनी केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲड. अभिजित इटकर, ॲड. औदुंबर तीर्थकर , ॲड. गुरुदत्त पाटील तर सरकारतर्फे ॲड. दत्ता पवार यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here